मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या दहशतवादी डॉक्टराला करायचाय कोरोनाबाधितांवर उपचार; परवानगीसाठी कोर्टात धाव

निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या दहशतवादी डॉक्टराला करायचाय कोरोनाबाधितांवर उपचार; परवानगीसाठी कोर्टात धाव

विविध गुन्ह्यांच्या आरोपांखाली दिल्लीच्या तिहार तुरुंगात (Central Jail Tihar)असलेला डॉक्टर साबील अहमद (Dr Sabeel Ahmed) याने तुरुंगातल्या कोरोनाबाधितांवर (Covid19)उपचार करू देण्याची परवानगी मागितली आहे. ही मागणी करण्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) धाव घेतली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 14 मे : कोरोनाच्या कठीण काळात मानवी जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन समाजात घडत आहे. कोरोना योद्धे तर जिवाचं रान करतच आहेत, मात्र इतरही लोक आपल्याला जमेल तशी सेवा करत आहेत. तर कोणी आर्थिक मदत करतं आहे. त्याउलट कोणी मदतीच्या नावाखाली लुटायची कामं करतं आहे, तर कोणी गरजूंना उघडपणे लुटताना दिसत आहे. अशीच एक वेगळी घटना दिल्लीच्या तिहार तुरुंगात घडली आहे. अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा कथित सदस्य असलेला आणि विविध गुन्ह्यांच्या आरोपांखाली दिल्लीच्या तिहार तुरुंगात (Central Jail Tihar)असलेला डॉक्टर साबील अहमद (Dr Sabeel Ahmed) याने तुरुंगातल्या कोरोनाबाधितांवर (Covid19)उपचार करू देण्याची परवानगी मागितली आहे. ही मागणी करण्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) धाव घेतली आहे. 'पीटीआय'च्या हवाल्याने 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

विशेष न्यायाधीश धर्मेंद्र राणा (Justice Dharmender Rana) यांच्या न्यायालयात साबील अहमदच्यावतीने बुधवारी (12मे) अर्ज दाखल करण्यात आला. कोविड-19च्या रुग्णांची संख्या सध्या वाढलेली आहे. त्यामुळे तुरुंगातल्या कैद्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून असलेला आपला अनुभव उपयुक्त ठरू शकेल आणि आपण तुरुंग प्रशासनाला त्याबाबतीत सहाय्य करू शकू, असं साबीलच्या अर्जात म्हटलं आहे. तुरुंग अधीक्षकांना तशी परवानगी देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी साबीलचे वकील एम. एस. खान (Adv. M. S. Khan) यांनी या अर्जाद्वारे केली आहे.

'आरोपी हा क्वालिफाइड एमबीबीएस डॉक्टर आहे. त्याला गंभीर रुग्ण हाताळण्याचा सात वर्षांचा अनुभव आहे, या गोष्टीची नोंद घ्यायला हवी. त्याचा अनुभव आणि तज्ज्ञता यांचा दिल्लीतल्या तिहार तुरुंगातल्या कोविड-19च्या रुग्णांवर उपचारांसाठी उपयोग होऊ शकेल. त्यामुळे आरोपीला तुरुंग प्रशासनाला वैद्यकीय बाबतीत सहाय्य करू देण्याची परवानगी दिली जावी, असे निर्देश तुरुंग अधीक्षकांना देण्यात यावेत,' अशी विनंती साबीलच्यावतीने त्याचे वकील एम. एस. खान यांनी दाखल केलेल्या अर्जात केली आहे.

अल-कायदा इन दी इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा (Terrorist Organization) सदस्य असलेल्या साबीलला 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. संबंधित संघटनेच्या भारतातल्या आणि अन्य देशांतल्या सदस्यांना अर्थसहाय्य तसंच मालवाहतुकीसंदर्भात सहाय्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ब्रिटनमधल्या ग्लासगो विमानतळावर 30 जून 2007 रोजी झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यातलाही तो आरोपी आहे . 20 ऑगस्ट 2020 रोजी सौदी अरेबियातून त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं. बेंगळुरूमधल्या अन्य एका दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एनआयए (NIA)अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2021रोजी ताज्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाकडे त्याची रवानगी करण्यात आली. तेव्हापासून तो तिहारच्या तुरुंगात आहे.

First published:

Tags: Corona, Doctor contribution, Terrorist, Tihar jail