जयपूर, 19 जानेवारी : राजस्थानातील (Rajasthan News) राजसमंदमधील गावात पंचाच्या तालिबानी निर्णयाचा निषेध केला जात आहे. या निर्णयाअंतर्गत पती-पत्नीला भरगावासमोर काठीने मारहाण करण्यात आली. मिळेल्या माहितीनुसार, महिलाने पहिल्या पतीला सोडलं होतं आणि ती उदयपूरमध्ये एका व्यक्तीसोबत राहत होती. (Terrible punishment given in front of the village for second marriage) तिच्या सासरच्या मंडळींना हे आवडलं नाही. ते महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीला गावी घेऊन आले. या पंचांनी शिक्षेचा तालिबानी निर्णय सुनावला. यानंतर महिला आणि दुसऱ्या पतीला रशीने बांधलं. याशिवाय दोन तासांपर्यंत दोघांना मारहाण करीत राहिले. या दोघांना खूप जास्त मारहाण करण्यात आली. मात्र पंच आणि समाजाच्या भीतीने कोणीच काही बोलायला तयार नाही. मात्र पीडितांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तब्बल एक महिन्यापूर्वी महिलेने दुसरं लग्न केलं होतं. तिच्या पतीने सांगितलं की, आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतो. लग्नानंतर मी पत्नीसह माझ्या गरी राहत होतो. यादरम्यान 11 जानेवारी रोजी महिलेचा पहिला पती आणि काही जणं घरी आले आणि ते जबरदस्तीने आम्हाला घेऊन गेले. हे ही वाचा-धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेचलं डोकं, निर्घृण खुनाच्या घटनेनं पुणे हादरलं! येथे दोघांना रशीने बांधून मारहाण करण्यात आली. दोन तास त्यांना मारहाण केली जात होती. पंचांच्या उपस्थिती दोघांना मारहाण करण्यात आली. याशिवाय पंचांनी दोघांवर 40 हजार रुपयांचा दंड सुनावला. समाजाच्या भीतीने दोघेही 6 दिवस शांत होते. मात्र यानंतर दोघांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्ये दोघांना मारहाण केल्याचं दिसून येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jaipur, Marriage, Wife and husband