Home /News /pune /

धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेचलं डोकं, निर्घृण खुनाच्या घटनेनं पुणे हादरलं!

धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेचलं डोकं, निर्घृण खुनाच्या घटनेनं पुणे हादरलं!

Murder in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरीत एका 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करत त्याचं डोकं ठेचलं आहे.

    पुणे, 19 जानेवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरीत (Pimpri) एका 29  वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी संबंधित तरुणाच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करत त्याचं डोकं ठेचलं (attack with sharp weapon and crushed head with stone) आहे. हत्येची ही भयावह घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी तरुणाची केलेली अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. पिंटू कुमार सहदेव शहा असं हत्या झालेल्या 29 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मृत शहा याचा भोसरी येथील गुळवेवस्ती परिसरात मृतदेह आढळून आला आहे. येथील एका स्थानिक नागरिकानं हा मृतदेह पाहिला असता, त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटना धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. मारेकऱ्यांनी तरुणाची केलेली भयंकर अवस्था पाहून पोलीस पथकालाही धक्का बसला. हेही वाचा-लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने घाव घातले होते. तर तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचं निष्पन्न झालं. हेही वाचा-बारामतीत पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या महिलेवर चाकुने केले वार, भयावह घटनेचा VIDEO मृत तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद आढळतंय का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच मृत तरुणचा कोणाशी काही वाद होता का? याचाही तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या