Home /News /crime /

सायबर हल्ल्यात 5 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या टेक महिंद्राचा घुमजाव; कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

सायबर हल्ल्यात 5 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या टेक महिंद्राचा घुमजाव; कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय

पिंपरी-चिंचवड, 24 मे : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. कारण एका सायबर हल्ल्यात 5 कोटींच नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीने आता चक्क घुमजाव केलं आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांपैकी स्मार्ट पार्किंग, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवेज, स्मार्ट ट्राफिक, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट सीसीटीव्ही अशी विविध कामांचे सर्व्हर तयार करण्यासाठी टेक महिंद्राला कोट्यवधीचे कंत्राट देण्यात आलं. मात्र, काही दिवसांपूर्वी आपले सर्व्हर हॅक करण्यात आल्याच सांगत हॅकर्सने तब्बल 27 सर्व्हर मधील डेटा इन्क्रीप्ट केला असून या सायबर हल्ल्यात आपलं 5 कोटी रुपयांच नुकसान झालं अशी तक्रार टेक महिंद्राकडून पोलिसात देण्यात आली होती. चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त NEWS 18 लोकमत ने दाखवलं आणि महापालिका प्रशासन खडबडून जागी झाली. हे ही वाचा-WhatsApp Privacy Policy स्वीकारली नाही? तुमच्यासाठी आता हे फीचर बंद त्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टेक महिंद्राला सायबर हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा तपशील मागवत नोटीस बजावली होती. त्यानुसार टेक महिंद्राकडून आता सायबर हल्ल्याबाबत लेखी खुलासा देण्यात आला आणि सुरुवातीला 5 कोटींच्या नुकसान झाल्याचा दावा कऱणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने आपल्या लेखी खुलाशात घुमजाव करत 5 कोटींच नुकसान झालं नसल्याचं म्हटलं. त्यामुळे या प्रकऱणाबद्दलचा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान हा सगळा प्रकार केवळ सायबर हल्ल्याच्या आड 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा बनाव करुन विमा लाटण्याचा डाव असल्याची शंका नगरसेविका सीमा सावळे यांनी व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सायबर हल्ल्यात 5 कोटींच नुकसान झालं नसल्याबाबत टेक महिंद्राकडून कुठलही नवं पत्र अजूनतरी सायबर सेलला देण्यात आलं नाही. त्यामुळे आधी दाखल असलेल्या तक्रारी नुसारच या प्रकरणाचा तपास करत असल्याचं पिंपरी चिंचवड सायबर सेलचे प्रमुख संजय तुंगार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सायबर हल्ल्या बाबत टेक महिंद्राने महापालिकेला जो लेखी खुलासा दिला. तो सायबर सेल पोलिसांना का कळवला नाही असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच बरोरब टेक महिंद्राच्या विश्वासहर्तेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील या प्रकरणी कठोर निर्णय घेऊन टेक महिंद्राला दिलेलं कंत्राट रद्द करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Cyber crime, Pune, Tech Mahindra

पुढील बातम्या