• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • आदिवासी तरुणाला 'तालिबानी' शिक्षा; पिकअपला बांधून फरफटत नेलं, मृत्यूनंतर परिसरात खळबळ

आदिवासी तरुणाला 'तालिबानी' शिक्षा; पिकअपला बांधून फरफटत नेलं, मृत्यूनंतर परिसरात खळबळ

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर निषेध व्यक्त केला जात आहे.

 • Share this:
  नीमच, 28 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच भागातून एक अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेत एका तरुणाला काही जणांनी भररस्त्यात पिकअप वाहनाच्या मागे बांधून फरफटत नेलं. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 8 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यामध्ये मुख्य आरोपीचादेखील समावेश आहे. ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाणे हद्दीतील आहे. आरोपीने पहिल्यांदा तरुणाला बाईकने धडक दिली. त्यानंतर आदिवासी तरुण भैया लाल भील याला बांधून फरफटत नेलं आणि मारहाण केली. या घटनेनंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 26 ऑगस्ट रोजी घडल्याचं समोर आलं आहे. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. हे ही वाचा-दारूच्या नशेत पतीची हत्या..सासुसमोर कबुली; तरी 4 दिवसांनी बंद दरवाज्यातून खुलासा या प्रकरणात नीमच एसपी सूरच कुमार वर्माने दिेलेल्या माहितीनुसार, 8 लोकांवर तरुणाच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. ज्यातील प्रमुख आरोपी छितरमल गुर्जर आणि महेंद्र गुर्जरला अटक केली आहे. पिकअप गाडीचे चालक आणि परिचालकला अटक करण्यात आली आहे. याची चौकशी सुरू आहे. याशिवाय दुसऱ्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या संशयावरुन आदिवासी तरुणाला इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. त्याला इतकं मारलं की यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: