सुरत, 14 फेब्रुवारी: सुरतमध्ये (Surat) एक धक्कादायक घटना घडली आहे. 37 वर्षीय पत्रकाराची (journalist) हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नी आणि तीन मुलींसमोर हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत जुनेद खान पठाण (Juned Khan Pathan) एका स्थानिक साप्ताहिकमध्ये काम करायचे. रविवारी गुजरातमधील सुरत शहरातील (Surat Murder) रांदेर परिसरात ही घटना घडली. पत्रकाराची हत्या झाली त्यावेळी पत्नी आणि तीन मुलीही उपस्थित होते. हे सगळे शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. पत्रकाराची हत्या आरोपींनी सुरुवातीला आधी आपली कार पत्रकाराच्या बाईकवर घातली. त्यानंतर चौघां आरोपीनं कारनं मागून बाईकला धडक दिली. धडक दिल्यानंतर बाईकवर असलेले पाच ही जण रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्यानंतर कारमधले चौघेही खाली उतरले आणि त्यांनी पठाण यांच्या पाठीत चाकू खुपसला आणि त्यांची हत्या केली. भरदिवसा आणि भररस्त्यात करण्यात आलेल्या या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. वर्दळीत्या जिलानी पुलावरुन पठाण कुटुंब जात होतं. त्यावेळी मागून आलेल्या कारनं त्यांच्या बाईकला धडक दिली. कारनं धडक देताच ते पाचही जण रस्त्यावर पडले. पडल्यानंतर उठण्याआधीचचार जणांनी कारमधून खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकूनं वार केले. त्यानंतर पठाण यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पठाण यांच्या मुलींचं वय 10 वर्षे, चार वर्षे आणि सर्वात लहान मुलीचं वय अवघं अडीच वर्ष आहे. या हत्येप्रकरणी रांदेर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पठाण यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला चार संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.