मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मेडिकल स्टोअरच्या आडून अफीमचा सप्लाय; 25 लाखांचा माल जप्त, पोलीसही हैराण

मेडिकल स्टोअरच्या आडून अफीमचा सप्लाय; 25 लाखांचा माल जप्त, पोलीसही हैराण

अटक करण्यात आलेला एक तस्कर मेडिकल स्टोअरचा (medical store) प्रमुख आहे.

अटक करण्यात आलेला एक तस्कर मेडिकल स्टोअरचा (medical store) प्रमुख आहे.

अटक करण्यात आलेला एक तस्कर मेडिकल स्टोअरचा (medical store) प्रमुख आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 27 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाढणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी (smuggling) प्रकरणाशी संबंधित यूपी एसटीएफ(UP STF) ची टीम जलद गतीने कारवाई करीत असल्याचं दिसून येत आहे. याअंतर्गत शनिवारी यूपी एसटीच्या टीमने मोठी कारवाई करीत बरेली आणि झारखंडमध्ये (Jharkhad) राहणारे दोन अफीम तस्करांना अटक (arrest) केलं. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अफीम असल्याचं दिसून आलं आहे. एसटीएफच्या टीमनुसार अटक करण्यात आलेला एक तस्कर बरेलीच्या मेडिकल स्टोअरचा (medical store) प्रमुख आहे.

झारखंडमधून मागवून मेडिकल स्टोअरवर करीत होता अफीमची तस्करी

यूपी एसटीएफच्या टीमने सांगितलं की, बरेलीच्या स्टेशन रोड स्थित दामोदर पार्कमधून एका कारला थांबवून झारखंडमध्ये राहणारा सुरेंद्र कुमार दांगी आणि बरेलीचा राहणारा भानू प्रतापला मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भानु प्रताप बरेलीमध्ये एका मेडिकल स्टोअरचा संचालक  आहे.

भानुने एसटीएफच्या टीमला सांगितलं की, तो सुरेंद्रकडून झारखंडच्या जंगलातून अफीम मागवित होता आणि मेडिकल स्टोअरच्या आडून सहजपणे ते सप्लाय करीत होता. शनिवारीदेखील सुरेंद्र झारखंड येथून तस्करी करण्यासाठी अफीम बरेलीच्या भानू प्रतापला देण्यासाठी आला होता, त्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली.

हे ही वाचा-मुलगा जामिनावर सुटताच बाप गजाआड; मिरवणुकीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांकडून धरपकड

25 लाखांचा अफीम घेतला ताब्यात

एसटीएफच्या टीमने सांगितलं की, दोन्ही तस्करांच्या अटकेदरम्यान त्यांच्याजवळ 25 लाख किमतीचे 1 किलो अफीम जप्त करण्यात आले. याशिवाय तस्करीसाठी वापरली जाणारी 1 ऑल्टो कारदेखील जप्त करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान झारखंडचे तस्कर सुरेंद्र यांनी सांगितलं की, झारखंड स्थित खूंटीच्या जंगलातून ताब्यात घेण्यात आलेली  70 हजार प्रती किलो अफीम भानू प्रतापला 1.10 लाख रुपयांच्या हिशोबाने देत होता.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh