Home /News /kolhapur /

मुलगा जामिनावर सुटताच बाप गजाआड; मिरवणुकीसाठी आलेल्या तरुणांना पोलिसांनी दाखवला इंगा

मुलगा जामिनावर सुटताच बाप गजाआड; मिरवणुकीसाठी आलेल्या तरुणांना पोलिसांनी दाखवला इंगा

Crime in Kolhapur: कळंबा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर येणाऱ्या आरोपीच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

    कोल्हापूर, 27 नोव्हेंबर: कळंबा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर येणाऱ्या आरोपीच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. कळंबा कारागृहाबाहेरील रस्त्यावर घोषणाबाजी आणि दंगामस्ती करणाऱ्या तरुणांची राजवाडा पोलिसांनी उचलबांगडी केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाच्या वडिलांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी यावेळी हुल्लडबाज तरुणांच्या दहा दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाणीची एक घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून अवधूत खटावकर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची चौकशी झाल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी खटावकर याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. हेही वाचा-पतीच्या निधनानंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडमधील घटना दरम्यान, गुरुवारी (25 नोव्हेंबर) संशयित आरोपी अवधूत खटावकर याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सायंकाळी तो कळंबा कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती मिळताच, खटावकरच्या काही समर्थकांनी कारागृहाबाहेर गर्दी केली. तसेच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची शहरातून मिरवणूक काढण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली होती. यावेळी घोषणाबाजी आणि दंगामस्ती सुरू असल्याची माहिती राजवाडा पोलिसांना मिळाली. हेही वाचा-मैत्रिणींसमोर 'चरसी' म्हटल्यानं कॉलेज विद्यार्थ्याला मारहाण; तरुणानं संपवलं जीवन या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धरपकड केली. यावेळी जवळपास 50 जणांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जामिनावर बाहेर येणाऱ्या आरोपीच्या वडिलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाच्या वडिलांसह अन्य दोघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास राजवाडा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या