मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! अंधश्रद्धेने घेतला 900 हून अधिक लोकांचा जीव, गावभर मृतदेहांचा पडला होता सडा

धक्कादायक! अंधश्रद्धेने घेतला 900 हून अधिक लोकांचा जीव, गावभर मृतदेहांचा पडला होता सडा

या घटनेमागे एका धर्मगुरुचा हात होता, जो स्वत:ला देवाचा अवतार मानत होता, काय आहे ही घटना..

या घटनेमागे एका धर्मगुरुचा हात होता, जो स्वत:ला देवाचा अवतार मानत होता, काय आहे ही घटना..

या घटनेमागे एका धर्मगुरुचा हात होता, जो स्वत:ला देवाचा अवतार मानत होता, काय आहे ही घटना..

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 12 जून : Weird News: जर तुम्हाला वाटत असेल की, अंधश्रद्धा (Superstition), जादू-टोना (Black Magic) वा तांत्रिक-मांत्रिकाच्या गोष्टी केवळ भारतात घडतात तर तुम्ही चूक आहात. साऊथ अमेरिकेतील (South America) गुयानामध्ये (Mass Suicide In Guyana) झालेल्या सामूहिक आत्महत्येच्या एका घटनेने जगाला मोठा हादरा दिला होता. ही घटना इतिहासात (Mass Suicide In History) लिहिलेली आहे आणि यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या घटनेमागे जिम जोन्स (Jim Jones) नामक एका धर्मगुरुचा हात होता, जो स्वत:ला देवाचा अवतार मानत होता, काय आहे ही घटना..

पीपल्स टेम्पलच्या नावावर हत्याकांड

जिम जोन्सने (Jim Jones) लोकांनी एकत्र यावे यासाठी गरजू लोकांच्या मदतीच्या नावाखाली 1956 मध्ये 'पीपल्स टेम्पल' (People's Temple) (लोकांचं मंदिर) नावाचं एक चर्च  (Church) तयार केलं. आपल्या धार्मिक गोष्टींनी (Religious Beliefs) आणि अंधश्रद्धेतून त्याने लोकांना आपला अनुयायी करुन घेतलं. जिम जोन्स कम्युनिस्ट (Communist) विचारधारेचा होता आणि त्याचे विचार अमेरिकेतील सरकारपेक्षा वेगळे होते. यामुळे तो आपल्या अनुयायांसोबत शहरापासून दूर गुयाना नावाच्या जंगलात राहत होता आणि येथेच त्याने एक लहानसं गावही वसवलं होतं. माक्ष जोनकिन याचं खरं रुप काही दिवसातच लोकांच्या समोर आलं.

हे ही वाचा-BJP नेत्याच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, आधी बलात्कार..डोळे काढले, त्यानंतर...

हुकूमशाहीमुळे लोक त्रस्त

जिम जोन्स आपल्या अनुयायांना दिवसभर काम करायला लावत असे आणि रात्रीदेखील तो त्यांना झोपू देत नव्हता. त्यांना त्रास देण्यासाठी तो आपले भाषण सुरू करायचा. या दरम्यान त्याचे सैनिक घराबाहेर जाऊन कुणी झोपलेले आहे का ते तपासत असत. जर कोणी झोपलेले आढळले तर त्याला कठोर शिक्षा दिली जात होती. जेव्हा अमेरिकन सरकारला याबाबत कळालं तर त्यांनी त्याला  रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर जोन्सने जे काही केलं, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्याने एका टबमध्ये धोकादायक विष मिसळून एक पेय तयार केले. गावातील लोकांना जबरदस्तीने ते ड्रिंक प्यायला दिलं. त्यामुळे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 300 हून अधिक लहान मुलांचा समावेश होता. या घटनेला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हत्याकांडापैकी एक मानलं जातं. सांगितलं जातं की, लोकांना मारल्यानंतर जिम जोन्स याचा मृतदेहदेखील एकेठिकाणी सापडलं होता.

First published:

Tags: Crime news, United States of America