कटिहार, 15 एप्रिल : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून एक हैराण करणारे वृत्त समोर आलं आहे. येथे ऑनलाइन गेममुळे हसत-खेळत असलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली. मोबाइलमध्ये या कुटुंबातील विद्यार्थी इतका बुडाला की, ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने तो रात्र-रात्रभर गेम खेळत असे. ऑनलाइन गेमचे वेड इतकं झालं की, यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कटिहार जिल्ह्यातील कोढा प्रखंडमधील मकईपूर गावातील आहे. येथे 15 वर्षीय विद्यार्थी आयुष कुमार याला मोबाइलवर तासनतास ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. आयुष 10 ते 12 तास मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होता. ज्या कारणामुळे आयुष आजारी पडत चालला होता आणि शेवटी आयुषचा मृत्यू झाला. हे ही वाचा- फाशीतून बचावली तर पत्नीला दिले इस्त्रीचे चटके, बाईकसाठी पतीचं राक्षसी कृत्य आयुषला गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं-वडील आयुषचे वडील राजेश चौहान यांनी सांगितलं की, आयुषला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. अनेकदा त्याला गेम खेळण्यापासून रोखलं जात होतं. मात्र तो याकडे दुर्लक्ष करीत होता. सतत ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे त्याचे डोक्यात वेदना होत होत्या. याबाबत त्याने कोणालाही काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा वेदना जास्त होत असे, तेव्हा तो औषध घेत असे. आणि गेम खेळणे सुरू करीत असे. ते म्हणाले की, मुलाला सक्ती केली असती तर आयुष वाचला असता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची तब्येत अचानक खराब झाली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोबाइल गेम बनलं त्याच्या मृत्यूचं कारणं - काका या प्रकरणात मृत आयुषचे वडील राजकुमार चौहान यांनी सांगितलं की, लॉकडाऊननंतर ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने 12-14 तास गेम खेळत होता. ज्या कारणाने त्याच्या डोक्यात वेदना होत होत्या. जेव्हा वेदना जास्त होत होत्या तेव्हा तो पेन किलर खात असे. मात्र याबाबत नंतर माहिती झाली. मोबाइलवर जास्त खेळ खेळला नसता तर तो आता जीवंत असता. मोबाइल गेम त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.