क्रूरतेचा कळस! फाशीतून बचावली तर पत्नीला दिले इस्त्रीचे चटके, बाईकसाठी पतीचं राक्षसी कृत्य

क्रूरतेचा कळस! फाशीतून बचावली तर पत्नीला दिले इस्त्रीचे चटके, बाईकसाठी पतीचं राक्षसी कृत्य

आधी पत्नीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून बचावल्यानंतर तिला इस्त्रीचे चटके दिले. विशेष म्हणजे हे सर्व त्यानं केलं ते सासरच्यांनी त्याला मोटरसायकल घेऊन दिली नाही म्हणून.

  • Share this:

शामली, 15 एप्रिल: मानवतेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पतीनं पत्नीवर राक्षसी अत्याचार करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आधी पत्नीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून बचावल्यानंतर तिला इस्त्रीचे चटके दिले. विशेष म्हणजे हे सर्व त्यानं केलं ते सासरच्यांनी त्याला मोटरसायकल घेऊन दिली नाही म्हणून. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार करत या घटनेबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे

शामली जिल्ह्यातल्या इस्सो पुरटील गावातील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या इरशाद आणि शबनम यांचा विवाह झाला होता. या दोघांच्या लग्नाला 3 वर्षे झाली असून त्यांना एक मुलगीही आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात या दोघांनी विवाह केला होता. शबनमचे वडील मजुरीचे काम करतात. त्यांची हुंडा देण्याची ऐपत नसल्याचे त्यांनी विवाहापूर्वीच सांगितले होते. पण आरोपीच्या नातेवाईकांनी विवाहाला संमती दिली होती. त्यानंतर या दोघांचा विवाह झाला. मात्र विवाहानंतर आरोपी इरशादनं हुंड्याची मागणी सुरू केली होती. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.

(हे वाचा-मुंबईतील हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड)

आरोपी इरशाद वारंवार हुंड्याची मागणी करत पीडितेवर अत्याचार करत होता. तिला वारंवार पैशाची मागणी करून तिच्यावर इरशाद अत्याचार करत होता. माहेरची हलाखीची परिस्थिती आणि लोकांच्या भीतीने शबनम हे सर्व मुकाट्यानं सहन करत होती. मात्र इरशादचे अत्याचार वाढले होते. त्यानं त्यानंतर सासरच्यांकडे दुचाकीची मागणी केली. मात्र हलाखीची परिस्थिती असल्याने शबनमचे घरचे ही मागणी पूर्ण करू शकत नव्हते.

शबनमनं कुणालाही काही सांगितलं नाही व सर्व अत्याचार सहन करत राहिली. अखेर इरशादनं शबनमला ठार मारण्याचा प्रयत्न केला. इरशादने आधी शबनमला फाशी दिली. पण त्यात ती वाचली त्यामुळं त्यानं गरम इस्त्रीचे चटके देत शबनमला संपवण्याचा प्रयत्न केला. शबनमच्या नातेवाईकांना हे समजल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 4:15 PM IST
Tags: crimeUP

ताज्या बातम्या