जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कॉपी करताना पकडल्याने एक वर्षासाठी निलंबित; विद्यार्थ्याने घेतला 'हा' टोकाचा निर्णय

कॉपी करताना पकडल्याने एक वर्षासाठी निलंबित; विद्यार्थ्याने घेतला 'हा' टोकाचा निर्णय

कॉपी करताना पकडल्याने एक वर्षासाठी निलंबित; विद्यार्थ्याने घेतला 'हा' टोकाचा निर्णय

स्वप्नील कृषी पदविकेचे शिक्षण घेत होता. येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सध्या परीक्षा सुरू असल्याने तो पेपर देण्यासाठी येडशी येथील आपल्या महाविद्यालयात गेला होता. यावेळी परिक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले.

  • -MIN READ
  • Last Updated :

उस्मानाबाद, 28 मे : कोरोनाकाळात ऑनलाईनच्या माध्यमातून परीक्षा (Online Exam) घेण्यात आल्या. कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर सरकारने सर्व प्रकारची निर्बंध हटवली आहे. यामुळे परीक्षादेखील ऑफलाईन स्वरुपात घेतल्या जात आहेत. यातच उस्मानाबादेत कृषी पदविकेच्या (Diploma in Agriculture) परीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं - कृषी पदविकेच्या एका विद्यार्थ्याला कॉपी (Copy) करताना पकडण्यात आले. यानंतर या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेने उस्मानाबाद हादरलं आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे (21) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे. कॉपी करताना पकडल्यावर एका वर्षासाठी निलंबित - स्वप्नील कृषी पदविकेचे शिक्षण घेत होता. येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सध्या परीक्षा सुरू असल्याने तो पेपर देण्यासाठी येडशी येथील आपल्या महाविद्यालयात गेला होता. यावेळी परिक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले. ही घटना 26 मे रोजी घडली. यानंतर कॉपी करताना पकडल्याने त्याला एक वर्षासाठी निलंबितही करण्यात आले. यानंतर विद्यार्थी स्वप्निल ढोबळे हा तणावात गेला होता. याच तणावातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्नीलने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा -  थरकाप फडवणारा प्रकार! मित्राने मित्राची केली हत्या; तंदूरमध्ये मृतदेह जळाला नाही म्हणून तुकडे तुकडे पुरले स्वप्नीलने ढोबळे या विद्यार्थ्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई आणि एक भाऊ आहे. दरम्यान, 21 वर्षाच्या स्वप्नीलने आत्मत्या केल्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात