चंदीगड, 16 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षांपासून शिकवणी (Tution) घेणारे दिव्यांग विनय मेहता आणि त्यांच्या पत्नीला एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. 9 वर्षांपूर्वी हा विद्यार्थी (Student) मेहता दाम्पत्याकडून ट्यूशन घेत होता. मेहता दाम्पत्यावर हल्ला केल्यानंतर या विद्यार्थ्याने बाहेरून दरवाजाला टाळं लावलं आणि तेथून फरार झाला. चाकून भोसकल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 9 वर्षांपूर्वी शिकवणीसाठी येणारा विद्यार्थी काल संध्याकाळी शिक्षकांच्या घरी आला होता. ज्यानंतर दाम्पत्याने त्याला चहा-कॉपी दिली. तिघेजण बराच वेळ गप्पा मारत होते. काही वेळानंतर शिक्षिका बाजारात घरी परतल्यानंतर तरुणाला बाहेर सोडायला गेली तर अचानक त्याने महिलेवर हल्ला केला. यानंतर शिक्षिकाने खोलीच्या दिशेने पळाली. तरुणाने त्या दोघांना खोलीत बांधलं आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. यानंतर स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि त्यांच्यावर अनेकदा वार केले. यात पती-पत्नी दोघेही जबर जखमी झाले आहे. निघताना तरुणाने महिलेने घातलेले सोन्याचे दागिने, घरातील कॅश घेऊन बाहेर टाळं लावून फरार झाला. कसं बसं दाम्पत्याने शेजारी फोन करून या घटनेची माहिती दिली. हे ही वाचा- फोटो काढायला गेली अन् जाळ्यात अडकली, बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार यानंतर शेजारच्यांनी बाहेरून लावलेलं टाळं उघडलं आणि पती-पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. सध्या या प्रकरणात पोलीस तपास करीत आहे. त्यांनी सांगितलं की, हा तरुण उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नोकरी करतो. यापूर्वीही तो अनेकदा त्यांच्या घरी आला आहे. ते त्याला चांगलं ओळखतात. त्या दिवशी तो आला तेव्हा त्याने शिक्षिकेकडून 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर चाकूने भोसकून तो फरार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







