Home /News /maharashtra /

फोटो काढायला गेली अन् नराधमाच्या जाळ्यात अडकली, बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

फोटो काढायला गेली अन् नराधमाच्या जाळ्यात अडकली, बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

Rape on Minor Girl in Beed: बीड जिल्ह्यातील धारूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.

    धारूर, 16 फेब्रुवारी: बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर (Dharur) शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार (2 men raped minor girl) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुण हा फोटोग्राफर असून त्याने पीडितेला फोटो देण्याच्या बहाण्याने स्टुडिओमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारेन, अशी धमकी दिली (Threat to kill brother) होती. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मधूर बाळासाहेब फरतडे आणि सहदेव चाळक असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी धारूर शहरातील रहिवासी आहे. पुढारीनं दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीच्या नरसिंह फोटो स्टुडिओमध्ये पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी गेली होती. यावेळी फोटो काढल्यानंतर आरोपीनं फोटो घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी या, असं सांगितलं. हेही वाचा-धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरकडून तरुणीवर बलात्कार;डेक्कन पोलिसांत FIR दाखल दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी फोटो आणण्यासाठी स्टुडिओमध्ये गेली असता, आरोपीनं संधी साधत स्टुडिओमध्येच पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. तसेच घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीनं दिल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. दरम्यान एकेदिवशी पीडित मुलगी नरसिंह स्टुडिओमध्ये दोन्ही आरोपींसोबत गप्पा मारत बसली होती. यावेळी पहिला आरोपी फोटो काढण्यासाठी बाहेर निघून गेला होता. हेही वाचा-कोल्हापुरात SEX रॅकेटचा पर्दाफाश;मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार यावेळी पीडितेला स्टुडिओमध्ये एकटी पाहून दुसऱ्या आरोपीनं देखील तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या आरोपीनं देखील पीडितेला धमकी दिली. अखेर पीडित मुलीने धाडस करून धारूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलामाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Rape on minor

    पुढील बातम्या