Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलीस ठाण्यात जप्त केलेला दारूसाठा गायब; 1400 पेट्या लंपास, तपासादरम्यान अधिकारीही हैराण!

पोलीस ठाण्यात जप्त केलेला दारूसाठा गायब; 1400 पेट्या लंपास, तपासादरम्यान अधिकारीही हैराण!

 अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता.

अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता.

अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 13 मार्च : उत्तर प्रदेशातील एटा (Etah) जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता. मात्र उत्तर प्रदेशातील या पोलीस ठाण्यातूनही दारुचा साठा गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  यापैकी 1400 बॉक्सेस पोलीस ठाण्यातून गायब  (Liquor Missing) झाल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

तपासादरम्यान मिळालेली माहिती ही धक्कादायक असून जप्त केलेला दारू साठा दुसऱ्या कोणी नाही तर पोलिसांनी विकल्याचा प्रकार घडला आहे. ज्यानंतर कारवाई करीत पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि हेड विरोधात गुन्हा दाखल करीत दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. एटाचे एसएसपी सुनील कुमार सिंह यांनी या बाबत सांगितलं की, अलीगडचे एसपी पीयूष मोर्डिया आणि पोलीस कमिश्नर गौरव दयाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात तपासणी करण्यात आली होती. तपासात 1400 दारुच्या बाटल्यांचे खोके गायब झाल्याची तक्रार आल्यानंतर एसएसपींनी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि आणखी एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. पंचायत निवडणुकीसाठी पोलीस ठाण्यात जी शस्त्र जमा करण्यात आली आहेत, त्यात घोटाळा आहे, अशी सूचना एटाचे डीएम यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. (Stocks of liquor seized at police station disappear 1400 boxes)

हे ही वाचा-भयंकर! इंजिनिअरिंग कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून बेल्टने मारहाण

तपासादरम्यान शस्त्रांस्त्रांच्या संख्येत घोटाळा असल्याचं दिसलं, मात्र याबरोबरच नवीन माहिती समोर आली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जप्त करुन ठाण्यात ठेवण्यात आलेल्या दारुची विक्री करण्यात आली आहे. ज्यानंतर पोलिसांकडून ठाण्यात सापडलेल्या दारूच्या साठ्याचा तपास करण्यात आला. ज्यात 1400 दारूचे खोके गायब झाल्याचं आढळलं. या घोटाळ्याबाबत ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. यानंतर एसओ इंद्रेश भदोरिया आणि हेड मुंशी विशाल सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

इतर पोलीस ठाण्यातही तपास

या प्रकरणात एटाचे डीएम म्हणाले की, दारूची अवैध्यपणे विक्री केल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चुकी केली तर माफी मिळणार नाही, असा संदेश जिल्ह्यातील लोकांना मिळाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता इतर पोलीस ठाण्यातही अशा प्रकारची तपासणी करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Crime news, Illegal liquor, Liquor stock, Police arrest, Uttar pradesh