जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! जन्मदात्या आईची हत्या केली; शरीराचे 1000 तुकडे करुन शिजवून खाल्ले

धक्कादायक! जन्मदात्या आईची हत्या केली; शरीराचे 1000 तुकडे करुन शिजवून खाल्ले

धक्कादायक! जन्मदात्या आईची हत्या केली; शरीराचे 1000 तुकडे करुन शिजवून खाल्ले

या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सुनसार त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

स्पेन, 24 एप्रिल: स्पेन **(Spain)**मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या (killed mother) केली आहे. इतकेच नाही तर या तरुणाने तिची हत्या केल्यावर तुकडे तुकडे (Chopped her body) करुन मांसही खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपीला 15 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय एल्बर्टो सांचेज गोमेज हा एक बेरोजगार असून मेड्रिड येथे राहतो. मारिया गोमेज यांच्या एका मित्राच्या तक्रारीनंतर पोलीस सांचेज याच्या घरी दाखल झाले. यावेळी सांचेज याच्या 68 वर्षीय आई मारिया गोमेजच्या शरीराचे काही तुकडे त्यांना फ्रिजमध्ये आढळून आले. तर काही तुकडे एका प्लास्टिक बॅगमध्ये आढळून आले. मारिया गोमेज या बेपत्ता असल्याची तक्रार काही दिवसापूर्वी त्यांच्या मित्राने पोलिसांत केली होती. या तक्रारीनंतर पोलीस जेव्हा मारिया गोमेज यांच्या घरी पोहोचली आणि तपासणी सुरू केली तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकरणी मुलगा सांचेज याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. वाचा:  यवतमाळमध्ये लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू पोलिसांनी सांगितले की, जेव्हा मारिया गोमेज यांच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हा सांचेज याने दरवाजा उघडला. त्याने आम्हाला सांगितले की, मारिया गोमेज येथेच आहे मात्र, ती आता मृत आहे. मी आणि माझ्या कुत्र्याने मिळून तिचे तुकडे खाल्ले. पोलिसांनी सांचेज याच्या जबाबानंतर जेव्हा घराची झाडाझडती केली तेव्हा फ्रिजमध्ये आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत मारिया गोमेज यांच्या शरीराचे तुकडे आढळून आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Murder , spain
  • First Published :
जाहिरात
जाहिरात