Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कृतघ्न! आईला ‘ओम नमः शिवाय’ म्हणायलं सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं

कृतघ्न! आईला ‘ओम नमः शिवाय’ म्हणायलं सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं

आपल्या लग्नासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या (Son push her mother into well) आईलाच तिच्या मुलाने विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

भोपाळ, 10 ऑक्टोबर : आपल्या लग्नासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या (Son push her mother into well) आईलाच तिच्या मुलाने विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईला विहिरीच्या काठावर उभं करून तिला ‘ओम नमः शिवाय’ असं म्हणायला लावून मुलानं तिला चक्क विहिरीत ढकलून दिलं. या घटनेची माहिती (Neighbors informed police) शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मात्र आपल्या मुलावर कुठलीही कारवाई करू नका, असंच ही माऊली सांगत राहिली.

लग्नासाठी हवे होते पैसे

मध्यप्रदेशातील रतलाममध्ये राहणाऱ्या कलाबाई हा दिव्यांग आहेत. त्यांना 22 वर्षांचा पुष्कर नावाचा मुलगा आहे. त्याला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र अनेक दिवसांपासून त्याचं लग्न जमत नव्हतं. आपल्याला लग्न करायचं असून त्यासाठी 5 हजार रुपयांची गरज असल्याचं त्यानं कलाबाईंना सांगितलं. कलाबाईंकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याची मागणी फेटाळून लावली. याचा राग मनात धरून पुष्करनं आईचाच काटा काढायचा डाव आखला.

आईला ढकललं विहिरीत

आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असल्याचं पुष्करने आईला सांगितलं. हातात नारळ घेऊन एका विहिरीच्या काठावर उभं राहायचं, डोळे मिटून ‘ओम नमः शिवाय’ म्हणायचं आणि नारळ विहिरीत फेकून द्यायचा, असं त्याने आईला सांगितलं. मुलावर विश्वास ठेवत आईने मंत्र म्हणण्यासाठी विहिरीच्या काठावर उभं राहत डोळे मिटले. त्यानंतर पुष्करनं पाठिमागून जोरदार धक्का देत आईला विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यानंतर मोटारीची वायर हाताला लागल्यामुळे कलाबाई विहिरीत बुडण्यापासून वाचल्या. शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली.

हे वाचा - टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूचा मी खून केलाय! आरोपीच्या फोनने पोलिसही चक्रावले

तक्रार करायला टाळाटाळ

शेजाऱ्यांनी सांगितल्यावरही कलाबाई आपल्या मुलाविरुद्ध तक्रार करायला तयार नव्हत्या. त्याला कुठलाही त्रास होऊ नये, असंच त्यांचं म्हणणं होतं. लोकांच्या आग्रहानंतर त्यांनी तक्रार नोंदवली असली, तरी मुलाला शिक्षा झाल्यास तक्रार मागे घेणार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

First published:

Tags: Crime, Madhya pradesh, Mother