गुरुदासपूर, 20 जुलै: देशात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारीही (Crime rate) वाढली आहे. गुन्हा करणारे लोकं क्रूरतेचा कळस गाठताहेत. यालाच दुजोरा देणारी एक घटना पंजाबच्या गुरुदासपूर (Gurudaspur) इथे घडली आहे. मुलानं आपल्या वडिलांची विजेचा धक्का देऊन हत्या (Son killed father) केली आहे.
वडिलांच्या इलेक्ट्रोक्यूशनद्वारे केलेल्या हत्येप्रकरणी गुरदासपूरच्या पोलिसांनी मुलाला अटक केली (Crime news) आहे. आरोपी हरपालसिंगनं वडील तरसेम सिंगला रात्री ट्रॉलीमध्ये घेऊन अंत्यसंस्कार केले आणि राखही विसर्जित केली. पोलिसांनी मृताचा मोठा मुलगा रचनापाल सिंग यांच्या विधानावर कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचा मोठा भाऊ रचपाल सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, त्याची आई बलविंदर कौर यांचा 2019 मध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन सुमारे साडे 12 एकर असून ती पत्नी आणि मुलांच्या वाट्याला समान आली. आईच्या निधनानंतर त्यांचे वडील गावातच एका वेगळ्या घरात राहत होते, सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यानं वडिलांना त्याच्याकडे आणलं होतं.
हे वाचा -सावधान! पुण्यात हॅकिंगचा नवीन पॅटर्न; IT क्षेत्रातील लोकांना बनवलं जातंय टार्गेट
काही दिवसांपूर्वी वडील गावात आले होते. दुसर्या दिवशी रचपाल सिंग याला माहिती मिळाली की हरपाल आपल्या वडिलांशी भांडत आहे. त्याने भावाला फोनवर वडिलांशी बोलण्यास सांगितलं, परंतु बोलणं झालं नाही, त्यानंतर काही दिवसांनी त्याला गावातून फोन आला की काल रात्री वडिलांचं निधन झालं आहे, आणि लहान भावानं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.
अधिक तपास केल्यानंतर हरपालसिंग यानं विजेचा धक्का देऊन वडिलांचा खून केला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानंतर त्यानं त्यांच्या अस्थी किरातपूर साहिबमध्ये विसर्जित केल्या अशी माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news