वाराणसी 14 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधून हत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका मुलानंच आपल्या पित्याची निर्घृण हत्या (Son Killed Father In UP) केल्याचं प्रकरण घडलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. चित्रकूटचे एसपी अंकित मित्तल यांनी रविवारी याबद्दलची माहिती दिली आहे.
अंकित मित्तल यांनी सांगितलं, की बुधवारी 10 मार्चला दिवसाच निही चिरैया गावात पीडिताची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. मृताची ओळख बांदा जिल्ह्यातील रहिवासी राजू उर्फ भोला जायसवाल अशी सांगण्यात आली आहे. या व्यक्तीचं वय 42 वर्ष होतं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी काही टीम कामाला लावल्या होत्या.
मित्तल म्हणाले, की मानिकपूरचे एसएचओ सुभाषचंद्र चौरसिया यांनी संशयित आरोपी असलेल्या मृत राजूच्या २० वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलं. या मुलाचं नाव शोभित जायसवाल असं आहे. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. यावेळी शोभितनं आपल्या एका राजा नावाच्या मित्रासोबत मिळून ही हत्या (Son Stabbed Father) केल्याचं मान्य केलं. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितलं, की शोभितची चौकशी केल्यानंतर त्याच्या वडीलांचे रक्तानं माखलेले कपडे, हत्येसाठी वापरला गेलेला चाकू आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेला शोभितचा मित्र अजूनही गायब आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. हत्येचं कारण विचारलं असता शोभितनं सांगितलं, की त्याचे वडील पंजाबच्या लुधियाना शहरात एका महिलेसोबत राहात होते. याच कारणामुळे त्यांनी गावातील जमीनही विकली होती आणि याचे पैसेही त्या महिलेवर खर्च करत होते. याच कारणामुळे आपण एका मित्रासोबत मिळून वडीलांची हत्या केल्याचं त्यानं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Father passed away, Murder news, Shocking news, Son, Women extramarital affair