मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शोकांतिका! मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, मुलाचा मृतदेह पाहून दुःखात बुडलेल्या पित्याला दुसऱ्या ट्रेनने उडवले

शोकांतिका! मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, मुलाचा मृतदेह पाहून दुःखात बुडलेल्या पित्याला दुसऱ्या ट्रेनने उडवले

मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची आणि शेजारच्याच ट्रॅकवर उभ्या असलेल्या वडिलांना दुसऱ्या ट्रेननं धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

भोपाळ, 3 डिसेंबर: कौटुंबिक वादातून तरुणाने आत्महत्या केली असून त्याची समजूत काढण्यासाठी (Son and father died under train) आलेल्या वडिलांनादेखील ट्रेनने उडवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील वादांना कंटाळून आत्महत्या (Family dispute) करण्याच्या इराद्यानं तरुण रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभा राहिला. त्याची समजूत काढणारे वडील त्याच्या मागोमाग चालले होते. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे (Death of father and son) कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अशी घडली घटना

मध्यप्रदेशच्या होशंगाबाद परिसरात छोटेलाल विश्वकर्मा हा तरुण पत्नी, आई, वडील आणि दोन मुलांसह राहत होता. दिवाळीच्या दिवशी झालेल्या भांडणानंतर छोटेलालची पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर घरात सतत भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी छोटेलालचा वडील मोहनलाल यांच्यासोबत जोरदार वाद झाला. त्यानंतर आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत, असं सांगत छोटेलाल घराबाहेर पडला आणि रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं निघाला. त्याची समजूत काढण्यासाठी वडील मोहनलालदेखील त्याच्या मागे चालले होते. मात्र झपाझप चालत जात छोटेलाल ट्रेनसमोर उभा राहिला. काही क्षणांतच ट्रेन त्याच्या अंगावरून गेली आणि त्याच्या देहाचे अक्षरशः तुकडे झाले. ही घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारे त्याचे वडील दुःख करत ट्रॅकवरच बसून आसवं ढाळू लागले. त्याचवेळी ट्रॅकवरून आलेल्या दुसऱ्या ट्रेननं वडिलांना जोरदार धक्का दिसला. या घटनेत वडील काही फूट दूर उडाले आणि गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा - पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी अडवली कंगना रणौतची कार; केली माफी मागण्याची

घरी केवळ आजी आणि नातवंडं

तरुण मुलगा आणि वडील यांच्या मृत्यूनंतर आता घरी छोटेलालची वृद्ध आई, पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांचा मुलगा एवढेच उरले आहेत. या मुलांचे वडील मरण पावले आहेत, तर आई निघून गेली आहे. मृत पितापुत्रांवर ग्रामस्थांनी एकत्र येत अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Death, Father passed away, Madhya pradesh, Suicide