मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पोलिसांच्या या प्रामाणिक 'मैत्रिणी'ने अर्ध्या तासात शोधले बलात्कारी; Sniffer Dog मुळे 6 आरोपी गजाआड

पोलिसांच्या या प्रामाणिक 'मैत्रिणी'ने अर्ध्या तासात शोधले बलात्कारी; Sniffer Dog मुळे 6 आरोपी गजाआड

आरोपीचा माग काढण्यात पोलिसांसोबत असलेले श्वान (Sniffer dogs) काय कमाल करू शकतात, याचं उदाहरण गुजरातमधील (Gujrat) एका घटनेतून नुकतंच समोर आलं आहे.

वडोदरा, 19 ऑगस्ट : आरोपीचा माग काढण्यात पोलिसांसोबत असलेले श्वान (Sniffer dogs) काय कमाल करू शकतात, याचं उदाहरण गुजरातमधील (Gujrat) एका घटनेतून नुकतंच समोर आलं आहे. वडोदऱ्यातील (Vadodara) एका बलात्कार आणि खुनाच्या (Rape and Murder) प्रकरणात डॉबरमॅन जातीच्या स्त्री श्वासानं पोलिसांची अशी काही मदत केली की केवळ 30 मिनिटांत पोलीस थेट आरोपींजवळ पोहोचले.

काय आहे प्रकरण?

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात एका 30 वर्षीय महिलेवर काहीजणांनी बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीला आली होती. 16 ऑगस्ट या दिवशी ही महिला देहतान नावाच्या गावात गवत कापण्याचं काम करत होती. याच वेळी सहाजणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि पकडले जाण्याच्या भितीने या महिलेचा खून केला. याच घनदाट झाडी असलेल्या भागात तिचा मृतदेह टाकून आरोपी पसार झाले होते. महिलेच्या नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर या महिलेचा मृतदेह त्यांना सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यातील रिपोर्टनुसार या महिलेचा खून होण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं होतं.

हे वाचा -पोलीस ठाण्यातच आरोपीची गळफास घेत आत्महत्या

श्वानानं केली कमाल

घटनास्थळी पोलिसांनी जावा नावाच्या श्वानाला पाचारण केल्यानंतर तिला घटनास्थळी सापडलेली ओढणी आणि एक बाटली हुंगण्यासाठी देण्यात आली. त्यानंतर जावा पोलिसांना सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वास काढत घेऊन गेली. एका ठिकाणी पोहोचून एका तरुणाकडे पाहून ती जोरजोरात भुंकायला लागली. तोच आरोपी असल्याचा हा संकेत होता. पोलिसांनी हा संकेत ओळखून 22 वर्षीय लाल बहादूर गिरीजाराम नावाच्या आरोपीला अटक केली. हा आरोपी 22 वर्षांचा असून मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने इतर पाच जणांची नावे आणि ठावठिकाणा सांगितला. त्यावरून पोलिसांनी सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Dog, Rape accussed