Home /News /crime /

महागड्या साड्यांसोबत ब्रँडेड दारूच्या बाटल्या; कपड्यांच्या प्रसिद्ध शोरूममध्ये घडला हा प्रकार

महागड्या साड्यांसोबत ब्रँडेड दारूच्या बाटल्या; कपड्यांच्या प्रसिद्ध शोरूममध्ये घडला हा प्रकार

या शोरूममधील एका खोलीत महागड्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता.

    पाटना, 11 जुलै : बिहारमध्ये दारूबंदी (Prohibition of alcohol in Bihar) आहे. परिणामी येथे दारू माफियांचं रॅकेट (Alcohol mafia racket) सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. सध्या येथे दारू तस्करीसाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढल्या जात आहेत. पोलिसांनीदेखील कंबर कसली असून अशा ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान बिहारमधील एका प्रसिद्ध शोरूममध्ये दारूची तस्करी (Smuggling of liquor in famous showrooms) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापेमारीची तयारी सुरू केली. मात्र सुरुवातीला साध्या कपड्यात पोलिसांची टीम ग्राहक बनून या शोरूमवर दाखल झाली. हाजीपूर येथे एक मोठं शो रूम आहे. येथे गेल्यानंतर पोलिसांना जे आढळलं ते पाहून धक्काच बसला. येथे साड्या, लेहंगा यांच्यामध्ये महागड्या दारूची तस्करी केली जात होती. मात्र सुरुवातील पोलीस कारवाई न करता केवळ रेकी करीत होते. सुरुवातीला सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे त्यांनी खरेदी केली आणि हळूहळू सर्व प्रकार समजून घेतला. हे ही वाचा-OYO हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरुण-तरुणी पोलीस या शोरूममध्ये ग्राहक बनून गेल्यामुळे त्यांना नेमका प्रकार लक्षात आला होता. सुरुवातील जेव्हा पोलीस ग्राहक बननू तेथे गेले तर त्यांनी काही खरेदी केली. त्यानंतर हळू हळू कर्मचाऱ्यांकडून दारू विक्री बाबात विचारू लागले. कर्मचाऱ्यांनीही घडत असलेलं सर्व पोलिसांना सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या टीमने येथे येऊन छापेमारी केली. पोलिसांनी शोरूममधून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहे. या दारूच्या बाटल्या महागड्या असून साडी व इतर कपड्यांसोबत पाठवल्या जात होत्या. या प्रकरणात मालकालाही अटक करण्यात आली आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Alcohol, Bihar, Crime news

    पुढील बातम्या