मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

श्रद्धाचा मित्र गॉडविनने सांगितली आफताबची गुपिते, कोणाच्याही मनाचा थरकाप उडेल

श्रद्धाचा मित्र गॉडविनने सांगितली आफताबची गुपिते, कोणाच्याही मनाचा थरकाप उडेल

श्रद्धाचा मित्र गॉडविनने सांगितली आफताबची गुपिते

श्रद्धाचा मित्र गॉडविनने सांगितली आफताबची गुपिते

गॉडविनने सांगितले की, जेव्हा श्रद्धाला आफताबने मारहाण केली आणि ती कशीतरी त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली, तेव्हा त्यानेच श्रद्धाला त्याचा मित्र राहुल राय सोबत तुळींज पोलिस स्टेशनला आफताबविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पाठवले होते.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर खून प्रकरणात पीडितेचा मित्र गॉडविन रॉड्रिग्ज याने वसई पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. वसई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॉडविनने सांगितले की, आफताब हा श्रद्धाबाबत खूप पझेसिव्ह होता. यामुळे नोव्हेंबर 2020 मध्येही त्याची श्रद्धासोबत भांडण झाले होते. रॉड्रिग्ज यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत असेही म्हटले आहे की, लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असताना आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरला कित्येकवेळा मारहाण केली होती. आफताबला श्रद्धा इतर कोणाशीही बोलली आवडत नसे. या गोष्टीवरून तो तिच्याशी भांडत असे.

गॉडविनच्या म्हणण्यानुसार, 'सुरुवातीला आफताबने दावा केला होता की तो तिच्याशी लग्न करेल. पण नंतर श्रद्धाला समजले की तो खूप ड्रग्स घेत होता. श्रद्धा मला सांगायची की, आफताब वीकेंडला ड्रग्ज घेतो. तो ब्राउनी बनवून विकायचा. ते फ्रीजमध्ये ठेव होता. आफताब मध्यरात्री अंमली पदार्थांची विक्री करायचा. हे सर्व श्रद्धाला अजिबात आवडत नव्हते. आफताबचे आई-वडील श्रद्धाला म्हणायचे की तू त्याच्यासोबत राहशील तर तूही मनोरुग्ण होशील. इतके दिवस आफताबसोबत राहणारा तू एकटीच आहेस. आफताबने 23 नोव्हेंबर 2020 रोजीही श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे श्रद्धाने माझी मदत मागितली होती.

2 वर्षांपूर्वी श्रद्धाने आफताबविरोधात पोलिसांत तक्रार केली होती

गॉडविन रॉड्रिग्ज यांनी वसई पोलिसांना सांगितले की, जेव्हा श्रद्धा दुसऱ्या व्यक्तीशी बोलायची तेव्हा आफताब त्याच्या दुचाकीवरून तिच्याभोवती फिरत असे. 23 नोव्हेंबर 2020 रोजी आफताबच्या पालकांनी श्रद्धाला फोन केला आणि तिला त्यांच्या घरी येण्यास सांगितले. गॉडविनने सांगितले आहे की, जेव्हा आफताबने श्रद्धावर प्राणघातक हल्ला केला आणि ती कशीतरी निसटून त्याच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा त्यानेच श्रद्धाला तिचा मित्र राहुल राय याच्यासोबत तुळींज पोलीस ठाण्यात आफताबविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पाठवले. आफताबने आत्महत्येची धमकी दिली होती, त्यामुळे श्रद्धाला तिची तक्रार मागे घेणे भाग पडले.

वाचा - श्रद्धा वालकर हत्याकांड : लहानपणापासूनच रागीट होता आफताब? बालपणीच्या मित्राने केले अनेक खुलासे

'आफताब ड्रग्ज घेत असे... तो अवैध मार्गाने पैसे कमवत असे'

गॉडविनच्या म्हणण्यानुसार, आफताबला भेटण्यापूर्वी श्रद्धा एकटीच प्रवास करत होती. तिला एकटीने नेपाळला जायचे होते. आफताबला हे आवडले नाही. त्याला श्रद्धा माझ्याशी बोलणेही आवजत नव्हते. तिला आफताबला सोडायचे होते. श्रद्धाचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, ज्यात तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. गॉडविनने सांगितले की, श्रद्धा जेव्हा माझ्याशी बोलली तेव्हाच हे फोटो आहेत.

त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते आणि नाकावर जखमांच्या खुणा होत्या. याच अवस्थेत ती पोलीस ठाण्यात गेली. अपार्टमेंटमध्ये जे काही सामान होते ते कर्जावर होते आणि ते सर्व श्रद्धाच्या नावावर घेतले होते. आफताब चुकीच्या मार्गाने पैसे कमवत होता. बंबल अॅपवर श्रद्धा आणि आफताबची भेट झाली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असतानाही तो डेटिंग अॅपवर होता. मी डेटिंग अॅपवर नसताना तू तिथे का आहेस, असा प्रश्नही श्रद्धाने उपस्थित केला होता. 2021 मध्ये मी श्रद्धासोबत शेवटचे संभाषण केले होते. त्यावेळी ती तिच्या कामावर खूश होती.

First published:

Tags: Crime, Vasai