वाशिंग्टन, 24 जानेवारी : पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेच्या राज्य आयोवाच्या एका युथ आउटरीच सेंटरमधील शाळेत अज्ञात माथेफिरूने गोळीबार केला. या गोळीबारमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर एका शिक्षिका जखमी झाली आहे.
AFP वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या राज्य आयोवामधील युथ आउटरीच सेंटरमध्ये सोमवारी एका माथेफिरूने गोळीबार केला. स्टार्ट्स राइट हियर (Starts Right Here) स्कूलमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक शिक्षिका आणि 2 विद्यार्थ्यांवर गोळीबार केला होता. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितलं की, कंट्रोल रुमला गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ताबडतोब 1 वाजेच्या सुमारास पोलीस तिथे पोहोचले. त्यावेळी 3 जण हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. या गोळीबारामध्ये शाळेतील एक कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे. गोळीबार कुणी आणि का केला या प्रकरणाच तपास पोलीस करत आहे. शाळेपासून काही किलोमिटर अंतरावर 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. एका शाळेमध्ये सहा वर्षांच्या मुलाने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडली होती.रिचनेक एलीमेंट्री स्कूल (Shooting at Richneck Elementary School) मध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या 6 वर्षांच्य मुलाला ताब्यात घेतलं आहे. आपल्यावर रागवली म्हणून या मुलाने गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.