चंडीगड, 25 सप्टेंबर : पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सैन्यदलातील एका जवान संजीव सिंग या आरोपीला अटक केली आहे. विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेली मुलगी ज्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करत होती आणि जो तिला सगळं डिलीट करण्याची धमकी देत होता, तो म्हणजेच सैन्य दलातील जवान संजीव सिंग आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिमल्यात राहणाऱ्या आरोपी तरुणीच्या प्रियकराने तिचे व्हिडिओ सैन्यदलातील हा जवान संजीव सिंगला पाठवले होता. यानंतर तो तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून इतर मुलींचे व्हिडिओ बनवण्यास भाग पाडू लागला. यावर मुलीने गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुली अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी काय म्हटले? या संपूर्ण प्रकरणावर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पंजाब आणि अरुणाचल पोलिसांना या जवानाला अटक करण्यासाठी आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यात आले. तसेच तपास लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्व शक्य सहकार्य करत राहू, असेही त्यांनी सांगितले.
Crucial breakthrough in the #ChandigarhUniversity case with the assistance of the #Army, #Assam & #Arunachal Police.
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) September 24, 2022
Accused army personnel Sanjeev Singh arrested from Sela Pass, Arunachal Pradesh. Transit remand obtained from Ld CJM Bomdilla for production before Mohali court. pic.twitter.com/eNhNq9W11R
एसआयटी करतेय तपास - पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील एमएमएस लीक प्रकरणात पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. या प्रकरणातील आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून डझनभर व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. सर्व व्हिडिओ आरोपी विद्यार्थिनीचे आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आता मुलीचा लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे. पंजाबच्या डीजीपी यांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आरोपी विद्यार्थिनीला सनी मेहता आणि रंकज वर्मा यांनी ब्लॅकमेल केल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दोघी विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ तिच्याकडे ऑर्डर करत होते. त्याचवेळी, दिल्ली, मुंबई आणि गुजरातमधील आरोपींच्या फोनवरून सतत कॉल येत होते, यावरून हे आरोपी कोणत्यातरी मोठ्या नेटवर्कशी जोडलेले आहेत, असेही समोर आले आहे. हेही वाचा - आयटीआय कॉलेजमध्ये भयानक प्रकार, वॉशरूममध्ये कपडे बदलणाऱ्या मुलीचा व्हिडिओ काढला अन् दरम्यान, व्हिडिओ लीक प्रकरणात आरोपी मुलगी आणि ब्लॅकमेलर सनी मेहता, रंकज वर्मा आणि आणखी एका आरोपीचा शोध लागला आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून काही व्हॉट्सअॅप चॅट जप्त केले आहेत. यामध्ये मोहित नावाचा व्यक्ती वारंवार विद्यार्थ्याला व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यास सांगत आहे, असे दिसत आहे. तसेच मोबाइलवर व्हिडिओ मागवल्यानंतर रंकज आणि सनी ते दुसऱ्या गॅझेटमध्ये सेव्ह करायचे, नंतर मोबाइलमधून डिलीट करायचे, पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले. पोलिसांना याची माहिती मिळताच पंजाब पोलीस सनी आणि रंकजला घेऊन शिमला पोहोचले. त्यांच्या घरावर छापा टाकून इतर गॅजेट्सची झडती घेण्यात आली.