जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Shocking! दोन पत्नी एक पती; मिळून त्याला संपवला; इतक्यांदा चाकू खुपसला की शरीराची केली चाळण

Shocking! दोन पत्नी एक पती; मिळून त्याला संपवला; इतक्यांदा चाकू खुपसला की शरीराची केली चाळण

Shocking! दोन पत्नी एक पती; मिळून त्याला संपवला; इतक्यांदा चाकू खुपसला की शरीराची केली चाळण

दोघींनाही एकमेकींबद्दल समजल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

  • -MIN READ Trending Desk Bihar
  • Last Updated :

    पाटना, 11 जुलै : एखाद्या व्यक्तीच्या जर दोन बायका असतील तर, त्या दोघी एकमेकींचा द्वेष करतात. सामान्यपणे हेच चित्र पूर्वीपासून दिसत आलेलं आहे. बिहारमधील दोन स्त्रिया मात्र याला अपवाद ठरल्या आहेत. बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका व्यक्तीच्या दोन बायकांनी मिळून आपल्या नवऱ्याचा खून केला आहे. दोघींनी मिळून नवऱ्यावर अनेक वार केले. नातेवाईकांनी तातडीनं पीडिताला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना छपरा जिल्ह्यातील भेल्दी पोलीस स्टेशन हद्दीतील बेडबलिया गावातील आहे. ‘एशियानेट न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलमगिर अन्सारी (45 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 9 जुलै रोजी संध्याकाळी अन्सारीच्या दोन बायका सलमा आणि अमिना या दोघींनी मिळून त्याचा खून केला. सलमा ही मृताची पहिली पत्नी असून 10 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. सहा महिन्यांपूर्वी आलमगिरनं बंगालमधील रहिवासी असलेल्या अमिनाशी लग्न केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आलमगिर अन्सारी हा गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत राहत होता. तो दिल्लीत एका खासगी कंपनीत कामाला होता. गेल्या महिन्यात ईदनिमित्त तो बिहारमधील त्याच्या घरी आला होता. जेव्हा त्याची पहिली पत्नी सलमाला ही गोष्ट समजली तेव्हा ती सवत अमिनासह सासरच्या घरी आली. त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला. तेव्हाच एकीनं आलमगिरचे हातपाय धरले तर दुसरीनं त्याच्यावर चाकूनं हल्ला केला. या झटापटीमध्ये आलमगिरच्या पोटात सुमारे सहा ते आठ वार करण्यात आले. Crime News : बंद कारमधून चोरट्यांनी लुटले 50 हजार रुपये, नेमकं काय घडलं? या प्रकरणाचा तपास करत असलेले भेल्दी पोलीस स्टेशनचे एसएचओ संतोष कुमार यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी सलमा आपल्या पतीला भेटण्यासाठी दिल्लीला गेली होती. तिथे सलमा आणि अमिना यांची भेट झाली. दोघींनाही एकमेकींबद्दल समजल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर सलमा अमिनाला घेऊन आपल्या माहेरी गेली. दोघीही सोबत राहत होत्या. ईदच्या दिवशी आलमगिर घरी आल्याचं समजताच दोघीही त्याला भेटण्यासाठी सासरच्या घरी गेल्या. दोघींनीही प्लॅन करून त्याचा खून केला. टीव्ही व ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंसक कार्यक्रम पाहून सामान्य नागरिकही घृणास्पद कृत्य करण्यास धजावत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर महिलाही निर्घृण अपराध करताना दिसत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात