जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime News : बंद कारमधून चोरट्यांनी लुटले 50 हजार रुपये, नेमकं काय घडलं?

Crime News : बंद कारमधून चोरट्यांनी लुटले 50 हजार रुपये, नेमकं काय घडलं?

घटनास्थळाचा फोटो

घटनास्थळाचा फोटो

सिवनीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Local18 Seoni,Madhya Pradesh
  • Last Updated :

अज़हर खान, प्रतिनिधी सिवनी, 11 जुलै : देशात दिवसेंदिवस चोरीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता मध्यप्रदेशातील सिवनी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी अगदी काही क्षणात बंद असलेल्या कारमधून तब्बल 50 हजार रुपयांची चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - भाजीपाला व्यापाऱ्याच्या कारमधून 50 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत नागपूर रोडवर असलेल्या कृषी उपज मंडईसमोर घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भाजी मंडईसमोर आधी भाजीपाला व्यापारी नौशाद खान यांची गाडी उभी होती. भाजीपाला व्यापारी गाडीतून उतरून आत मार्केटमध्ये जाण्यापूर्वी तीन चोरटे रेकी करत कारजवळ आले. यानंतर भाजी व्यापारी गाडीतून खाली उतरताच तिघांपैकी एक चोरटा भाजीपाला व्यापाऱ्याकडे लक्ष वळवण्यासाठी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने गेला. यावेळी एक चोराने अतिशय हुशारीने कारच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला. पण गाडी लॉक करताना भाजी व्यापाऱ्याची नजर त्या किंचित उघड्या असलेल्या दरवाजावर पडली. त्यामुळे त्या व्यापाऱ्याने दरवाजा पूर्णपणे बंद केला आणि गाडीला लॉक करुन आत मार्केटमध्ये गेला. दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेत एक चोर कारजवळ पोहोचला आणि अगदी काही क्षणात त्याने कारचा काच उघडला आणि चोरी केली. सिवनीचे एसडीओपी पुरुषोत्तम सिंह मारवी यांनी सांगितले की, ही घटना रविवारी सकाळी घडली. तसेच त्यांना सोशल मीडियावरून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये तीन अज्ञात चोरटे कारमधून चोरी करताना दिसत आहेत. सध्या पोलीस या घटनेची सत्यता तपासत आहेत. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात