जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाने मुलींनी केला गेम; 3600 तरुणींकडून मुलांना 150 कोटींचा चुना

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाने मुलींनी केला गेम; 3600 तरुणींकडून मुलांना 150 कोटींचा चुना

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाने मुलींनी केला गेम; 3600 तरुणींकडून मुलांना 150 कोटींचा चुना

पंजाबमध्ये (Punjab) सध्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज (Contract Marriage) करुन परदेशात स्थायिक होण्याचा नवा ट्रेंड (Trend) पाहायला मिळत आहे. मात्र यात मुलांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

    अमृतसर, पंजाब, 1 जुलै: पंजाबमध्ये (Punjab) सध्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज (Contract Marriage) करुन परदेशात स्थायिक होण्याचा नवा ट्रेंड (Trend) पाहायला मिळत आहे. मात्र यात मुलांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. या माध्यमातून दररोज 2 मुलांची फसवणूक होत आहे. आतापर्यंत 150 कोटी रुपयांची फसवणूक -  दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, परदेशात स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्या पंजाबमधील 3600 युवकांची बनावट विवाहामुळे (Fake Marriages) 150 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडे 3,300 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. यापैकी 3000 प्रकरणं ही पंजाबमधील आहेत. मागील 6 महिन्यात या विभागाकडे फसवणूकीच्या 200 तक्रारी आलेल्या आहेत. परदेशात गेल्यावर बदलते मुलींची भूमिका - अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या युवकांच्या पालकांनी आपला मुलगा परदेशात स्थायिक व्हावा यासाठी आयलेटस परीक्षा (इंटरनॅशनल इंग्लिश लॅग्वेज टेस्ट सिस्टीम IELTS) पास झालेल्या युवतींशी विवाह करुन दिला. यासाठी व्हिसा, इन्स्टिट्युशन फी आणि सिक्युरिटी रकमेपोटी 40 लाखांपर्यंत खर्च केला. मात्र परदेशात गेल्यावर युवतींची भूमिका बदलली आणि त्यांनी युवकांना तिकडे बोलावून घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात केवळ सर्वसामान्य नागरिकच नाहीत, तर इंजिनिअर, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांची फसवणूक झाली आहे. यामुळे परदेशात जाणं सोपं - स्पाउस व्हिसा (Spouse Visa) – युवतींच्या मदतीने स्पाउस व्हिसा घेत परदेशात जाता येतं. युवतींसाठी आयलेटसमध्ये 7 बॅण्डस असतात. या माध्यमातून संबंधित युवकांना परदेशात स्थायिक होणं सोपं जातं. ग्रीन कार्ड (Green Card) – न्यूझीलंडमध्ये पंजाबी विद्यार्थीनींची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे. त्यामुळे अशा युवतींशी लग्न करण्यासाठी अनेक युवक इच्छुक असतात. यासाठी पंजाबमध्ये काही एजंट्स डील देखील करतात. मोठ्या कुटुंबांतील युवकांची केली जाते फसवणूक - - आमच्या माहितीत एक अशी मुलगी आहे की जी आयलेटस पास आहे परंतु, तिच्या अभ्यास आणि व्हिसाचा खर्च द्यावा लागेल अशी माहिती गावातील एजंट कमी शिकलेल्या परिवारातील व्यक्तींना देतात आणि त्यांच्या मुलांचं या मुलींशी लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. - कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतर फसवणुकीची 3 महिन्यांत लुधियानात 30, तर जालंधरमध्ये 70 प्रकरणं नोंदवण्यात आली. पंजाबमध्ये 6 महिन्यांत अशी 300 प्रकरणं नोंदली गेली आहेत.

    (वाचा -  दक्षिण आफ्रिकेत महिलांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; दोन गटांत वादंग )

    फसवणूक करणाऱ्या नववधूंच्या कहाण्या - - जालंधरमधील एसआय रघुवीर सिंग यांचा मुलगा गुरविंदर सिंग याचा विवाह परनीतशी झाला. मुलीचा परदेशात जाण्याचा खर्च सिंग कुटुंबियांनी केला. 23 लाख खर्च करुन सुनेला परदेशात पाठवले मात्र ती तिथे गेल्यावर तिने फोन उचलणे बंद केले आणि नंतर घटस्फोट मागितला. - संगरुर जिल्ह्यातील फलेडा गावातील गुरजीवन सिंग याचा विवाह 22 डिसेंबर 2019 ला ठिंडा गावातील नाथपुरा येथील प्रभज्योत कौर हिच्यासोबत झाला. तिला कॅनडाला (Canada) पाठवण्यासाठी गुरजीवनने 30.41 लाख रुपये खर्च केले. मात्र कॅनडाला गेल्यावर प्रभज्योतने गुरजीवनला तिकडे बोलवण्यास नकार दिला. - फतेहगड साहिब जिल्ह्यातील गोविंदगड मंडी येथील मनजितसिंग यांच्या मुलाचा विवाह खमाणो येथील किरणशी झाला. तिला कॅनडाला पाठवण्यासाठी मनजीत यांनी 13 लाख खर्च केले. परंतु कॅनाडाला गेल्यावर हे लग्न एक नाटक होतं, असं किरणने सांगितलं. - मोगा येथील भूपिंदर सिंग यांचा विवाह पवनदीप कौरशी झाला. 30 लाख खर्चून त्याने तिला कॅनडाला पाठवलं. मात्र तिने नकार दिल्याने भूपिंदर यांना मानसिक आजार जडला त्यावर इलाजासाठी 40 हजार रुपये खर्च करावे लागले. - जालंधर येथील गोराया येथील मनदीपसिंग कॅनडा येथे स्थायिक होऊ इच्छित होते. ढड्डा गावातील तीर्थ सिंग यांची आयलेटस उत्तीर्ण प्रदीप कौर हिच्याशी त्याचे 9 सप्टेंबर 2019 ला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं. 25 लाख खर्च झाले. त्यानंतर प्रदीप कौर कॅनडाला निघून गेली. तिथे गेल्यावर तिने अजून 10 लाख रुपयांची मागणी केली. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातील वकील दलजीत कौर यांनी सांगितलं, की पंजाबमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या माध्यमातून फसवणूकीच्या तक्रारी वाढत आहेत. अशा प्रकरणात पोलीस फसवणूकीचा गुन्हा दाखल करतात, मात्र आरोपी परदेशात स्थायिक झाल्याने पुढील कारवाई होऊ शकत नाही. अशा आरोपींना डिपोर्ट करण्याबाबत कायदा केला पाहिजे म्हणजे कडक कारवाई करता येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात