जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! पुतण्यानं काकाच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून पेटवला, संपत्तीच्या वादातून कृत्य

धक्कादायक! पुतण्यानं काकाच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून पेटवला, संपत्तीच्या वादातून कृत्य

धक्कादायक! पुतण्यानं काकाच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून पेटवला, संपत्तीच्या वादातून कृत्य

धक्कादायक! पुतण्यानं काकाच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून पेटवला, संपत्तीच्या वादातून कृत्य

सायबर सिटी सोहना येथे एका व्यक्तीने त्याच्या काकांच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून तो पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 ऑक्टोबर: दिवाळीच्या सणानिमित्त सगळीकडे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. चोहीकडे दिवाळीची धामधूम आहे, पण काही ठिकाणी सणांना गालबोट लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक घटना हरियाणातील सोहना शहरात घडली आहे. सायबर सिटी सोहना येथे एका व्यक्तीने त्याच्या काकांच्या तोंडात फटाक्यांनी भरलेला पाईप कोंबून तो पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, नंतर डॉक्टरांनी त्याला सफदरजंग रुग्णालयात रेफर केलं आहे. या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या पीडित व्यक्तीच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपी पीडित व्यक्तीचे पुतणे आहेत. ही घटना रविवारी (23 ऑक्टोबर 22) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. सोहना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील एका आरोपीचे नाव जितेंद्र असे आहे. तो पीडित विजेंद्रचा पुतण्या आहे. तर अन्य दोन आरोपी अशोक आणि धरेंद्र हे त्याचे मित्र आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजेंद्र यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी विजेंद्र यांच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून, जितेंद्र आणि त्याचा मित्र अशोकला अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. आरोपींच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत. हेही वाचा:  खोटी मृत्यू प्रमाणपत्रं अन् गोशाळेतील जनावरांची विक्री; भंडाऱ्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश विजेंद्रची बहीण अनिताने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, दिवाळीच्या रात्री तिचा भाऊ शेतात गेला होता. यादरम्यान त्याचा पाठलाग करत असताना त्याचा पुतण्या जितेंद्र त्याच्या दोन मित्रांसह पोहोचला आणि त्याने विजेंद्र यांना पकडलं. यानंतर आरोपींनी विजेंद्रच्या तोंडात फटाक्यांचा पाईप टाकून तो पेटवला. जितेंद्रने विजेंद्रच्या पोटात गोळी झाडल्याचा आरोप अनिताने केल्या. सध्या विजेंद्र गंभीर जखमी आहेत. बहीण अनिताने सांगितलं की, गोळीबार आणि स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला. उपस्थित लोकांनी लगेच विजेंद्रला रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारांनंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. सध्या माझ्या भावाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे ते जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे, असं अनिता म्हणाली. जखमी व्यक्ती सध्या जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे या घटनेचे मूळ कारण अजून कळू शकले नाही. सध्या आरोपींची चौकशी आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे मालमत्तेच्या वादातून आरोपींनी हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, असं सोहना शहर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर निरीक्षक उमेश कुमार यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात