Home /News /crime /

पतीच्या परवानगीशिवाय घेतला स्मार्टफोन, पत्नीच्या हत्येची दिली सुपारी, धक्कादायक प्रकार

पतीच्या परवानगीशिवाय घेतला स्मार्टफोन, पत्नीच्या हत्येची दिली सुपारी, धक्कादायक प्रकार

पत्नीने परवानगी घेतली नव्हती, म्हणून पतीचा इगो दुखावला गेला आणि संतापाच्या भरात तो पत्नीच्या जीवावरच उठला.

    कलकत्ता, 24 जानेवारी : पती-पत्‍नीमध्ये (Husband Wife) नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन वाद-विवाद होत असतो. अनेकदा मोबाइल यामागील कारण असतं. (Mobile). मात्र हाच स्‍मार्टफोन (Smartphone) या दाम्पत्यामध्ये  (Couple) वादाचं इतकं मोठं कारण बनला की, पतीने पत्नीची हत्या करवून आणण्यासाठी (Wife Murder) भाड्याने गुंड बोलावले आणि (Contract Killer) त्याने थेट पत्नीची सुपारी दिली. ही घटना वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो. ही घटना पश्चिम बंगाल (West Bengal) मधील कलकत्ता (Kolkata) मध्ये घडली आहे. कलकत्ता (Kolkata Murder) च्या बाहेरील भागात नरेंद्रपुरमध्ये राहणारा 40 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीवर नाराज झाला. पत्नीने त्याची परवानगी न घेता स्वत:साठी स्मार्टफोन खरेदी केला होता. या सर्व घटनेनंतर मारेकरी आणि पतीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीसह राहत होता. पोलिसांनी सांगितलं की, तिच्या जखमी पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या पतीला नवा स्मार्टफोन खरेदी करण्यास सांगितलं होतं. मात्र पतीने तिला नवीन स्मार्टफोन आणून देण्यास नकार दिला. यानंतर पत्नीला खूप वाईट वाटलं. ही महिला काही ट्युशनसुद्धी घेत होती. यातून काही पैकी हाती लागत होते. पत्नीने या कमाईतून पतीला न विचारला नवा स्मार्टफोन खरेदी केला होता. 1 जानेवारीला तिचा नवा स्मार्टफोन घरी पोहोचला होता. नवीन स्मार्टफोन पाहून पत्नी खूप आनंदी झाली. मात्र जेव्हा पतीला याबद्दल कळालं तर तो खूप चिडला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री तिचा पती मुख्य दरवाजा बंद करण्यासाठी बाहेर गेला. मात्र परत आलाच नाही. यानंतर पत्नीला शंका आली म्हणून पतीला शोधण्यासाठी ती बाहेर गेली. तेव्हा तिच्यावर हल्ला केला. हे ही वाचा-अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा! एका हल्लेखोराने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यातून महिलेचा गळा चिरला गेला आणि खूप रक्तस्त्राव झाला. दरम्यान महिलेने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावलं. यानंतर तातडीने महिलेला रुग्णालयात हलवण्यात आलं. लोकांनी आरोपी पती आणि भाड्याच्या गुंडाना अटक केली आहे. दरम्यान एक हल्लेखोर अद्याप फरार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kolkata, Murder news, Wife and husband

    पुढील बातम्या