Home /News /crime /

अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा!

अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा!

राज्यातील अकोला (Akola News) जिल्ह्यात नात्यातील लज्जास्पद घटना (Shocking News) समोर आली आहे.

    अकोला, 24 जानेवारी : महाराष्ट्रातील अकोला (Akola News) जिल्ह्यात नात्यातील लज्जास्पद घटना (Shocking News) समोर आली आहे. येथे सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला कोल्ड ड्रिंकमध्ये दारू एकत्र करून प्यायला दिली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार (Rape) केला. जेव्हा अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाराष्ट्रातील अकोलाच्या अकोट शहरातील आहे. येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार केले. जेव्हा मुलगी गर्भवती झाली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. जेव्हा मुलीला ती गर्भवती असल्याचं कळालं तर कोणाला काहीही न सांगता घरी निघून गेली. त्यानंतर तिचा शोध सुरू केला. मात्र मुलगी सापडली नसल्याने ती बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार केली. हे ही वाचा-मास्क घालून शिरला क्लिनिकमध्ये, अन् एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर केला Attack यादरम्यान अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपी सावत्र बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडीत पाठवलं आहे. ही माहिती अकोल शहर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकारी राजेश जावरे यांनी दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Akola News, Crime, Rape

    पुढील बातम्या