• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी वडिलांचाच केला खून; कारण ऐकून चक्रावून जाल

12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी वडिलांचाच केला खून; कारण ऐकून चक्रावून जाल

12 वर्षीय आरोपी मुलगी मृत पोलीस अधिकारी वेरलांग यांची मुलगी आहे. तिने तिच्या मैत्रिणीसोबत मिळून आपल्याच वडिलांची चाकूने भोकसून हत्या केली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : एका 12 वर्षाच्या मुलीने तिच्या 13 वर्षाच्या मैत्रिणीसोबत मिळून आपल्याच वडिलांचा खून केल्याची (daughter kill father) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या मुलीचे वडील हे पोलीस अधिकारी होते. या मुलीने आपल्या पोलीस अधिकारी असलेल्या या पित्याची चाकूने भोकसून हत्या (murder news) केली. या हत्येमागील कारण जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा अनोखा प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या सांता कॅटरिना येथील 46 वर्षीय नेफे लुईझ वेरलंगच्या हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोन मुलींना अटक केली. त्यापैकी एक 12 वर्षांची आहे, तर दुसरी 13 वर्षांची आहे. 12 वर्षीय आरोपी मुलगी मृत पोलीस अधिकारी वेरलांग यांची मुलगी आहे. तिने तिच्या मैत्रिणीसोबत मिळून आपल्याच वडिलांची चाकूने भोकसून हत्या केली. या प्रकाराबाबत स्थानिक माध्यमांनी दावा केला आहे की, मुलींनी ही हत्या करण्याचं कारण म्हणजे त्यांना सुसान लुईस वॉन रिचथोफेनसारखे प्रसिद्ध व्हायचं होतं. हे वाचा - India vs Pakistan: संतापजनक! टीम इंडियाच्या पराभवानंतर शमीवर झाले फिक्सिंगचे आरोप प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला वडिलांचा खून या मुलींनी प्रसिद्धीसाठी हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. या विक्षिप्त मुलीला 2002 च्या खून खटल्यापासून प्रेरणा मिळाली (सुसान लुईस वॉन रिचथोफेन प्रकरण). वास्तविक, 20 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये सुझान (सुझान लुईस वॉन रिचथोफेन) नावाच्या मुलीने तिच्या पालकांची हत्या केली होती. सुझानने तिचा मित्र आणि प्रियकराच्या मदतीने ही हत्या केली होती. हे वाचा - ‘सुशांत आता आमच्यामध्ये असता तर..’ ‘छिछोरे’च्या दिग्दर्शकाने सांगितली मनाला चटका लावणारी गोष्ट या 12 वर्षांच्या मुलीला या प्रकरणासारखे काहीतरी करायचे होते, जेणेकरून ती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. यासाठी तिनं सुझानसारखे आपल्या आई-वडिलांना ठार मारण्याची योजना आखली होती. दोन्ही मुलींनी आपला गुन्हा कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण 15 ऑक्टोबरचे आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अजूनही सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published: