मुंबई, 14 जुलै- वडील आणि मुलीचं नातं अगदी जगावेगळं असतं. मुलीसाठी वडील सर्वस्व असतात आणि वडीलही मुलीला अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. पण एका नराधमाने मात्र स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि बाप- मुलीच्या नात्याला कळिमा फासला. या मुलीला ड्रग्ज देऊन या बापानं आपल्या दोन मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. स्वत:च्याच 16 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली पॉक्सो (Protection of Children from Sexual Offences (Pocso) Act) कायद्यांतर्गत मुंबईत एका व्यक्तीसह त्याच्या दोन मित्रांना 20 वर्षांच्या कडक तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 मधील ही घटना आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर याबद्दल सविस्तर वृत्त देण्यात आलं आहे.
विशेष न्यायाधीश एस. सी. जाधव (Special Judge S C Jadhav ) यांनी या तिघांना ही शिक्षा सुनावली. भारतीय दंडसंहितेनुसार (IPC) सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली कलम 376 –ड अंतर्गत आणि Pocso कायद्यामधील तरतुदींनुसार या तिघांना दोषी ठरवण्यात आलं. तसंच न्यायाधीश जाधव यांनी या प्रत्येक दोषीला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. ही रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या मुलीचे वडील ड्रग्जची विक्री करत होते. खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला आर्थर रोड जेलमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. 2018 मध्ये तो जेलमधून बाहेर आला. जेलमधून सुटल्यानंतर घरी आल्यावर आपल्या वडिलांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. घरी लहान भावंड नसताना ड्रग्ज देऊन ते माझ्यावर अत्याचार करायचे, असं या मुलीनं कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये म्हटलं आहे. या मुलीची आई त्यांच्यासोबत त्या घरी राहत नाही.
**(हे वाचा:** लॉजमध्ये एका बेडवर या अवस्थेत आढळले प्रेमी-युगूल, ट्रेन हुकल्याचं सांगत बुक केली होती रुम )
या मुलीचे वडील आणि त्यांचे दोन मित्र तिला बांद्र्यातील बँडस्टँड इथं घेऊन जायचे आणि तिथे ते तिच्यावर अत्याचार करायचे, असंही या मुलीनं सांगितलं. ही पीडित मुलगी अल्पवयीन आहे. या मुलीनं तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला होता; पण तिच्या आईनं यावर विश्वास ठेवला नाही. उलट या मुलीलाच तिनं मारलं. त्यानंतर या मुलीनं घर सोडलं आणि तिनं पनवेल गाठलं. तिथं तिनं भीक मागायला सुरुवात केली.
रेल्वे चाईल्डलाईनच्या एका सदस्याने तिला CSMT स्टेशनवर पाहिलं. घरातून पळाल्यानंचर 15 दिवसांनी ती CSMT स्टेशनवर होती. या मुलीनं आपली सर्व कहाणी चाईल्डलाईनच्या सदस्याला संगितली. त्यानंतर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आणि या मुलीला डोंगरीच्या बालसुधाररगृहात ठेवण्यात आलं, अशी माहिती विशेष सरकारी वकील वीणा शेलार (Special Public Prosecutor) यांनी दिली.

)







