भोपाळ, 30 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) राजगडचे ASI राजेंद्र मालवीय यांनी मैत्रिणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विष खावून आत्महत्या (ASI Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्यावर भोपाळमध्ये 10 दिवसांपर्यंत उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. राजगडच्या या पोलीस अधिकाऱ्याला गाण्याची खूप आवड होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी गायलेला एका गाण्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. (Betrayal by a girl friend, Police officer commits suicide in hotel ) मध्यप्रदेशातील नरसिंहगडच्या ज्या बारेलाल बँडची चर्चा असते, ASI राजेंद्र मालवीय त्या बँडचे मालक बारेलाल मालवीय यांचे पूत्र होते. नरसिंहगडच्या बारहद्वारी भागात राहणारे मालवीय यांनी तेथूनच बीकॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं होतं. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर 1995 मध्ये त्यांची निवड पोलीस विभागात झाली. गेल्या दीड वर्षांपासून राजेंद्र करनवास पोलीस ठाण्यात ड्यूटीवर आहेत. ASI यांना तीन मुलं आहेत. मोठी मुलगी वैष्णवी (21), भावेश (12) आणि जयस (10). हे ही वाचा- 48 हजारांचा लेहंगा, लग्नाची रात्र अन्; महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक कोण आहे? असे आले महिलेच्या संपर्कात… मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नरसिंहगडमध्ये राहणारे राजेंद्र मालवीय यांची ओळख त्यांच्याच गावात राहणाऱ्या गीतासोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढू लागला आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. महिलेने मैत्रीत दगा देत राजेंद्रला ब्लॅकमेल करण्यास सुरू केलं. ज्यामुळे ते त्रस्त झाले होते. राजेंद्रने 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता करनवासमधील एका हॉटेलमध्ये विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्येत बिघडल्यानंतर हॉटेल संचालकांनी पोलिसांना सूचना दिली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भोपाळला पाठवण्यात आलं. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या. त्यातच शुक्रवारी ASI राजेंद्र यांचा मृत्यू झाला.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.