जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 48 हजारांचा लेहंगा, लग्नाची रात्र अन् गोंधळ; भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक कोण आहे?

48 हजारांचा लेहंगा, लग्नाची रात्र अन् गोंधळ; भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक कोण आहे?

48 हजारांचा लेहंगा, लग्नाची रात्र अन् गोंधळ; भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक कोण आहे?

‘लग्न करा, अन्यथा दाती महारांजांसारखे पळावं लागेल’; बदनामीच्या भीतीने त्यांनी दुसऱ्याच दिवशी भय्यू महाराजांनी गोळी घालून आत्महत्या केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 29 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूर कोर्टाने शुक्रवारी विनायक, शरद आणि पलक या तिघांना भय्यू महाराजांना आत्महत्येस (Bhaiyyu maharaj suicide case) प्रवृत्त करण्यासाठी शिक्षा ठोठावली आहे. अनेक वर्षांपासून भय्यू महाराजांची शिष्या असलेली पलक हिला महाराजांसोबत लग्न करायचं होतं. यामध्ये सेवादार शरद आणि विनायकदेखील साथ देत होते. पलकने भय्यू महाराजांना धमकीही दिली होती. तुम्हाला 16 जून 2018 रोजी माझ्यासोबत लग्न करावच लागले. यादरम्यान दाती महाराजांनी आपल्या शिष्यासोबत बलात्कार केल्याचं प्रकरणदेखील समोर आलं होतं. ज्यामुळे पलकला भय्यू महाराजांवर दबाव निर्माण करण्याची आणखी एक संधी मिळाली. तिने लग्नाची तारीख ठरविल्याच्या 5 दिवसांपूर्वी म्हणजे 11 जून 2018 ला महाराजांना फोन करून धमकी दिली होती. लग्न करा, अन्यथा दाती महारांजांसारखे पळावं लागेल. बदनामीच्या भीतीने त्यांनी दुसऱ्याच दिवशी गोळी घालून आत्महत्या केली.  (Who is the palak ) याशिवाय मीडियाला बोलावून महाराजांची बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. पैशांची मागणी केली जात होती. पलक महाराजांकडून दीड लाख महिना घेत होती. याशिवाय 2.50 लाख रुपये करण्याची मागणी करीत होती. ते तिघे महाराजांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल होते. महाराजांनी आपल्या मोठ्या बहिणीला याबाबत खुलासा केला होता. आक्का मी अडकल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. हे ही वाचा- बंद खोलीचं गूढ उघड; भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी IAS भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीच्या मृत्यूनंतर पलक केअर टेकर म्हणून महाराजांसोबत जोडली गेली होती. यादरम्यान पलक आणि महाराजांमधील संबंध वाढले. यादरम्यान भय्यू महाराजांनी डॉ. आयुषीसोबत लग्न केलं. हे पलक आणि त्याच्या सहकाऱ्यांना आवडलं नाही. पलकने भय्यू महाराजांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. 48 हजारांना लेहंगा आणि.. पलक पुराणिक हिची नजर भय्यू महारांजाच्या संपत्तीवर होती. तिच्याकडे महाराजांच्या तिजोरीच्या किल्ल्यादेखील होत्या. महाराजांनी एप्रिल 2017 मध्ये डॉ. आयुषीसोबत लग्न केलं होतं. पलक महाराजांच्या संपर्कात दोन वर्षांपूर्वी आली होती. लग्नाच्या दिवशीही तिने खूप गोंधळ घातला होता. सोबतच ती महाराजांना ब्लॅकमेल करीत होती. पलक आश्रमच्या बाहेर लोकांना महाराजांची मुलगी असल्याचं सांगत होती. पलकने आपल्या बहिणीच्या लग्नात महाराजांकडून लाखो रुपये घेतले होते. महाराजांनी आपल्या लग्नात तिला 48 हजारांचा लेहंगाही दिली होता. 2018 मध्ये पोलिसांनी खुलासा केला होता की, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करीत असताना त्यांना नशेच्या औषधांचा ओव्हरडोजही दिला जात होता. पोलिसांना भय्यू महाराज आणि पलक यांच्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह चॅटिंग सापडले होते. याशिवाय पलककडे महाराजांचे काही वैयक्तिक व्हिडीओही होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात