Home /News /crime /

बाथरूममध्येच 17 वर्षीय पारसचा मृत्यू; अर्ध्या तासानंतर भावाने दार ठोठावलं आणि...

बाथरूममध्येच 17 वर्षीय पारसचा मृत्यू; अर्ध्या तासानंतर भावाने दार ठोठावलं आणि...

पारस नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्याची तयारी करीत होता. त्यात पुढील काही तासात त्याचा मृत्यू झाला.

    पानीपत, 12 फेब्रुवारी : हरियाणातील (Haryana News) पानीपत शहरात एक मोठी घटना घडली. तहसील कॅम्पातील रामनगरस्थित एका घराच्या बाथरूममध्ये अंघोळ करताना विद्यार्थ्याचा मृत्यू (Death) झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. तब्बल अर्धा तास झाला तरी मुलगा बाथरूमच्या बाहेर आला नाही, म्हणून कुटुंबीयांनी बाथरूमचं दार ठोठावलं. काही वेळानंतर काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी बाथरूमचं दार तोडलं. समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तर आत हा मुलगा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडला होता. यानंतर तातडीने मुलाला जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी सिव्हील रुग्णालयात जाण्यास सांगितलं. कुटुंबीय त्याला घेऊन सिव्हील रुग्णालयात पोहोचले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भावाने दिला होता आवाज... मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पारस शाळेत शिकत होता. नेहमीप्रमाणे आजही सकाळी तो सकाळी साडे आठ वाजता अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. 10 मिनिटांनंतर बाहेर उभ्या असलेल्या भावाने त्याला आवाजही दिला. मात्र तरीही पारस बाहेर आला नाही. अर्ध्या तासानंतर भावाने दार ठोठावलं. आतून काहीच आवाज आला नाही, तर त्यालाही शंका आली. त्याने घरातील इतर सदस्यांना बोलावलं. यानंतर दार तोडण्याचा प्रयत्न केला. आता पारस जमिनीवर पडला होता. छोट्या भावाचा एक वर्षापूर्वी आजारामुळे झाला होता मृत्यू... मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांना तीन मुलं होते. मोठा सचिन त्यानंतर पारस. छोट्या भावाचा एक वर्षापूर्वी आजारामुळे मृत्यू झाला होता. आज पारसच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा सचिन एकटा राहिला आहे. हे ही वाचा-मोठ्या आवाजात ऐकत होती गाणं; इअरफोनमुळे 21 वर्षीय मोनिकाचा गेला जीव कसा झाला मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, बाथरूममधील गॅस गिझरमुळे त्याला त्रास झाला. बाथरूममध्ये व्हेटिंलेशन असतं तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bathroom, Haryana, Student

    पुढील बातम्या