ब्रिटेन, 6 ऑक्टोबर : ब्रिटेनमध्ये (UK) एका महिलेने वयस्कर व्यक्तीला तब्बल 25 कोटीला (25 Crores Fraud) चुना लावला आहे. महिलेने स्वत:ला एका कंपनीचं सीईओ असल्याचं सांगितलं होतं. मात्र तपासात खुलासा झाला तर सर्वांचे डोळेच फिरले. महिला श्रीमंतांना शिकार करीत होती आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायची. ऑनलाइन फ्रॉडमधून तिने भरपूर पैसे कमावले होते. द सन युकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 34 वर्षीय सेक्स वर्कर (Sex Worker) लुइस कॅपलनने 68 वर्षीय व्यक्तीसोबत ऑनलाइन मैत्री (Online Friendship) केली. कॅपलन लोकांसह हॉटेलमध्ये जात होती. मात्र पीडित व्यक्तीला याबाबत माहिती नव्हती. (sex worker defrauds 68 years old customer of Rs 25 crore ) एकेदिवशी लुईस कॅपलन ही वयस्कर व्यक्तीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. येथे तिने व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढलं. दोन ते तीन भेटीतच त्या व्यक्तीने कॅपलन हिला 10 कोटी रुपये गिफ्ट दिले. मात्र इतक्यातच महिलेचा हव्यास संपला नाही. महिलेने व्यक्तीकडून दुबई आणि डबलिन येथे व्यवसाय (Business) करण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपये काढले. मात्र दोन्ही ठिकाणी महिलेचा कोणताही बिझनेस नव्हता. यादरम्यान व्यक्तीला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. वयस्क व्यक्तीने याबाबत मनस्ताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. महिलेने आतापर्यंत अनेकांना धोका दिला आहे. या प्रकरणात केस दाखल करीत तिला कोर्टात हजर करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तिने केलेल्या गुन्हांवरुन तिला किमान 7 वर्षांचा तुरुंगवास हू शकतो. हे ही वाचा- शेजाऱ्याच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना; क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, लुईस कॅपलनने सोशल मीडियावर (Social Media Profile) अनेक प्रोफाइल तयार केल्या आहेत. ज्यात तिने आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत. कशात ती स्वत:ला फॅशन डिजायनर तर कशात ती कंपनीची सीईओ असल्याचा दावा ककते. मात्र आता तिच्या सर्व गोष्टींचा खुलासा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.