मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /धक्कादायक! भर मुंबईत चालू रिक्षात अत्याचाराचा प्रयत्न, स्वरक्षणासाठी धावत्या रिक्षातून उडी मारल्याने महिला जखमी

धक्कादायक! भर मुंबईत चालू रिक्षात अत्याचाराचा प्रयत्न, स्वरक्षणासाठी धावत्या रिक्षातून उडी मारल्याने महिला जखमी

अंधेरी या गजबजलेल्या उपनगरात एका रिक्षाचालकानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं महिलेवर अत्याचाराचा (Molestation) प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी कसं शोधलं आणि बेड्या ठोकल्या वााचा..

मुंबई, 09 एप्रिल : मुंबई ही महिला सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम शहर मानलं जातं. रात्री-बेरात्री एकटी महिला इथे बिनधास्त फिरते अशी ख्याती. पण याच मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधेरी  या गजबजलेल्या उपनगरात एका रिक्षाचालकानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं महिलेवर अत्याचाराचा (Molestation) प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.  धावत्या रिक्षातून उडी मारल्याने या घटनेत महिला मात्र जखमी झाली आहे. (Auto Driver attempted to molest lady in Andheri)

ही घटना दोन दिवसांपूर्वी अंधेरी पूर्वेकडून मालाडला जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवर घडली. पीडित महिला रात्री पाऊणच्या सुमारास रिक्षामध्ये बसली होती. तिला मालाडला जायचं होतं. यावेळी रिक्षामध्ये रिक्षाचालकाचा मित्र आधीच बसलेला होता. रिक्षा धावायला लागल्यानंतर काही अंतरावर जाताच मागे बसलेल्या व्यक्तीने या महिलेला आक्षेपार्हरीत्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलेने या प्रकाराचा विरोध केला आणि रिक्षा चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. मात्र मागे बसलेल्या मित्राच्या सांगण्यावरून रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली नाही. उलट तो रिक्षा वेगाने चालवत राहिला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने रिक्षामधून बाहेर उडी मारली. त्यात महिलेच्या हातावर आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. रिक्षाचालक आणि त्याचा मित्र तिथून फरार झाले.

वाचा - LIVE VIDEO: Gunpointवर सुनेला ठेवलं घरात डांबून,तिच्या वडिलांवरही झाडल्या गोळ्या

या प्रकारानंतर महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी महिलेने केलेल्या वर्णनानुसार दोन्ही आरोपींचे स्केच तयार केले. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांची चौकशी केली तसेच सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान पोलिसांना संबंधित रिक्षाबद्दल माहिती मिळाली. तसंच मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना अटकही केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी गुन्हा मान्य केला. दोन्ही आरोपी कांदिवली पूर्वमधील चाळींमध्ये राहणारे आहेत.

First published:

Tags: Andheri, Crime, Mumbai