जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रस्त्याच्या किनाऱ्यावर वडिलांचा मृतदेह ठेवून 7 मुलांमध्ये मारहाण; अंत्यदर्शनापूर्वीच तिघे रुग्णालयात

रस्त्याच्या किनाऱ्यावर वडिलांचा मृतदेह ठेवून 7 मुलांमध्ये मारहाण; अंत्यदर्शनापूर्वीच तिघे रुग्णालयात

रस्त्याच्या किनाऱ्यावर वडिलांचा मृतदेह ठेवून 7 मुलांमध्ये मारहाण; अंत्यदर्शनापूर्वीच तिघे रुग्णालयात

शेवटी पोलिसांसमोर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 5 मे : हरयाणातील (Haryana News) नरियाला गावात बुधवारी खळबळ उडाली. 85 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर 7 मुलांची मारामारी झाली. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाताना तीन वेळा मुलांमध्ये मारहाण झाली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत ज्येष्ठ व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्याप कोणत्याही पक्षाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. या मारहाणीत तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीने 7 मुलं आहेत. मात्र सातही जणं वेगवेगळे राहतात. वडिलांच्या मृत्यूनंतर एका मुलाने मोठा मृत्यूभोज कार्यक्रम करण्यास सांगितला. याचा सहाही मुलांनी विरोघ केला. यादरम्यान मुलांमधील वाद वाढला आणि सातही जणं मारामारी करू लागले. यादरम्यान गावकऱ्यांनी त्यांना शांत केलं. मृतदेह स्मशानात घेऊन जातानाच हा सर्व प्रकार घडला. आधी मृतदेह रस्त्याच्या किनाऱ्यावर ठेवून मुलांना शांत करण्यात आलं. हे ही वाचा- 4 वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; पतीच्या मृत्यूच्या एका तासात पत्नीनेही संपवलं जीवन एक मुलगा आणि दोन नातवंड रुग्णालयात दाखल… मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहासमोरच मुलांमध्ये मारहाण सुरू झाली. यानंतर कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन करून याबाबत सूचना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकच नाही तर यावेळी घरात असलेल्या महिलांमध्येही वाद झाला. या वादात एक मुलगा आणि दोन नातवंडाला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात