भोपाल, 3 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भोपाळमध्ये डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने प्रोफेसर पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रेन हॅमरेजमुळे या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. यानंतर त्या रुग्णालयात डॉक्टरांना म्हणाल्या होत्या की, यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कुणीच नाही. असं म्हणून त्या रुग्णालयातून बाहेर पडल्या आणि भदभदा ब्रिजवरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर मंगळवारी पती-पत्नीवर एकत्रच अत्यंसंस्कार करण्यात आले. 47 वर्षीय डॉक्टर पराग पाठक (MDS) भाभा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. 28 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता त्यांची तब्येत अचानक बिघडली. यावेळी त्यांची असिस्टेंट प्रोफेसर पत्नी प्रीती झारिया (44) यांनी पतीला पाणी दिलं. यानंतर त्यांना घेऊन त्या अरेरा कॉलनीतील नॅशनल रुग्णालयात पोहोचल्या. येथे कळालं की, ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. दुसऱ्या दिवशी सर्जरीनंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हे ही वाचा- कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात, जादूटोण्याच्या संशयातून हत्या 2 मेच्या रात्री साधारण 2 वाजता डॉक्टरांनी प्रीतीला सांगितलं की, तिचा पती परागचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून प्रीतींना धक्काच बसला. त्यांना मोठ्या भावाला फोन केला. काही वेळातच दोघे भाऊ रुग्णालयात पोहोचले. यादरम्यान प्रीतीने डॉक्टरांना सांगितलं की, आता त्यांचा जगून काहीच उपयोग नाही. या जगात माझं दुसंर कुणीच नाही. यानंतर त्यांनी भदभदा ब्रिजवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी झालं होतं लग्न… जबलपूर राहणारी प्रीती भोपाळमधील नरेला कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर होती. चार वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. दोघांना मूल नव्हतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.