जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / चोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमालही जप्त

चोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमालही जप्त

चोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमालही जप्त

घटनेचे गांभीर्य पाहून समता नगर पोलिसांनी ताबडतोब तपास पथक नेमले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रशांत पांडे, प्रतिनिधी मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला परिसरात घरकाम करणाऱ्या नोकराला समता नगर पोलिसांनी चोरीप्रकरणी बिहार मधून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव विजयकुमार श्रीप्रसाद बहरदार आहे. आपल्या मालक आणि मालकिणीची नजर चुकवून घरातील तब्बल 9 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शिखा शिनेश शिंघवी हे कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात राहत आहेत. त्यांनी आपल्या घरात बेडरूम मधील लॉकरमध्ये सोने व हिऱ्यांचे दागिने ठेवले होते. मात्र, एक दिवशी मोठ्या मुलाला मुलाला चैन घालायला देण्याच्या बहाण्याने कपाट उघडले असता लॉकर गायब झाल्याचे दिसून आले. यामुळे फिर्यादी शिखा आणि तिचा पती यांनी संपूर्ण घरात तपासणी केली असता लॉकर कुठेही आढळले नाही. त्यामुळे त्यांनी या घटनेची तक्रार समता नगर पोलीस स्टेशन मध्ये दिली. घटनेचे गांभीर्य पाहून समता नगर पोलिसांनी ताबडतोब तपास पथक नेमले. यानंतर फिर्यादीसोबत जाऊन त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी त्यांच्या घरातील नोकरच दागिन्यांचा लॉकर घेऊन जात असल्याचे दिसून आले.आरोपीचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक बाबीद्वारे आरोपी बिहारमध्ये असल्याचे समजले. यामुळे गुन्हे प्रकटीकरण पथकाने बिहारमध्ये जाऊन त्यास अटक केली. हेही वाचा -  एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 कोटींचा माल जप्त त्याने काही सोने सोनाराकडे विकले होते. विकलेले सोनेदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच इतरही काही दागिने विकून एक दुचाकीदेखील खरेदी केली होती, ती दुचाकीदेखील त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे आरोपीकडून एकूण आठ लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात