जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पहिल्या मजल्यावरुन अमेरिकन नागरिकांना व्हायग्राची विक्री, मुंबईतील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश 

पहिल्या मजल्यावरुन अमेरिकन नागरिकांना व्हायग्राची विक्री, मुंबईतील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश 

पहिल्या मजल्यावरुन अमेरिकन नागरिकांना व्हायग्राची विक्री, मुंबईतील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश 

पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्लान आखला आणि धक्कादायक प्रकार समोर आला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा/ मुंबई, 12 डिसेंबर : बोरीवली गोराई परिसरात अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीस छापा घालून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात बोरीवली पोलिसांनी मंगळवारी 5 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेली टोळी ही अमेरिकेत बंदी असलेली औषधे सवलतीच्या दरात खरेदी करण्याचे आमिष देत होती. एकदा समोरच्या व्यक्तीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला की, समोरच्याकडून क्रेडीट / डेबिट कार्डने अमेरिकन चलनामध्ये पैसे घेऊन फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 डिसेंबर रोजी बोरीवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार, लाइफ स्टाईल फिटनेस प्रॉडक्टच्या नावाने गोराई बोरीवली पश्चिम येथे काही व्यक्ती इंटरनेट कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना कॉल करून अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून फसवणूक करत होती. आरोपी अमेरिकन शैलीत संभाषण करून त्यांचा विश्वास संपादन करायचे. एकदा त्यांचा विश्वास संपादन केला की, व्हायग्रा, सिआलीस, लिव्हेट्रा अशी अमेरिकेत प्रतिबंध असलेली औषधे कमी किंमतीत विकत देण्याचे आमिष द्यायचे. ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर घेवून ऑनलाईन पैसे घेवून फसवणूक करत असे.

पत्नीचे गावातील तरुणाशी अनैतिक संबंध, पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पतीने उचललं हे पाऊल

ही सर्व माहिती समोर आल्यानंतर, बोरीवली पोलीस पथकाने सोमवारी रात्री 9.30 वाजता सदर ठिकाणी छापेमारी सुरू केली. आरोपी आपसात संगनमत करून विनापरवाना ऑनलाईन पध्दतीने संगणक प्रणालीचा वापर करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचं आढळलं. आरोपी अमेरिकास्थित नागरिकांशी ऑनलाईन संपर्क साधून अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून अमेरिकेमध्ये बंदी असलेली औषधे 30 ते 50 टक्के सूट देवून खरेदी करण्याचे आमिष दाखवत होते. या मोबदल्यात त्यांच्याकडून क्रेडीट / डेबिट कार्डने अमेरिकन डॉलरमध्ये पैसे घेऊन फसवणूक करण्यासाठी बनावट कॉल सेंटर चालविताना आढळून आले. याबाबत बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना मंगळवारी अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात