मुंबई, 07 मे: स्फोटकं निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचा मोठा साठा ठाण्यातून जप्त (Seized large reserves of uranium) करण्यात आला आहे. या प्रकरणी एटीएसने ठाण्यातून दोघांना अटक केली आहे. मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या आणि किरणोत्सर्गाची प्रचंड क्षमता असणाऱ्या युरेनियमचा तब्बल 7 किलोचा (7 Kg Uranium Seized) साठा महाराष्ट्र दहशतवादी प्रतिबंधक पथकाने (ATS) जप्त केला आहे. याची बाजारात तब्बल 21 कोटी 30 लाख रुपये एवढी किंमत (21 crore 30 Lac worth) आहे. अलीकडच्या काळात एटीएसने केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
14 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे जिगर पंड्या नावाच्या एका 27 वर्षीय युवकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याच्याकडे काही युरेनियमचे तुकडे आढळले. संबंधित युवक हे युरेनियमचे तुकडे विकण्यासाठी ग्राहक शोधत होता. आरोपी जिगर पंड्याला अटक करून चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलीस खाक्या दाखवताच त्यानं मुख्य साठ्याची माहिती दिली.
भंगार बाजारातून 7 किलो 100 ग्रॅम वजनचा युरेनियमचा साठा जप्त
पंड्यानं माहिती दिल्यानंतर, एटीएसच्या पथकानं ठाण्यातील मानखुर्द भंगार बाजारात धाड टाकली. याठिकाणी तब्बल 7 किलो 100 ग्रॅम वजनाचा नैसर्गिक स्वरुपातील युरेनियमचा साठा आढळला आहे. याची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी 30 लाख एवढी आहे. एवढा मोठा साठा आरोपींकडे कोठून आला याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे.
हे वाचा-घटनास्थळी आढळल्या 21 फिंगर प्रिंट, मॉनिटरमुळे लागला खून प्रकरणातील आरोपीचा शोध
भंगार बाजारातून हा साठा हस्तगत केल्यानंतर पुढील तपासणीसाठी हा साठा भाभा अणुसंशोधन केंद्राकडे तपासणीसाठी वापरण्यात आला. भाभा अणुसंशोधन केंद्राने या साठ्याचं विश्लेषण केलं असून हा 90 टक्के शुद्ध असलेला नैसर्गिक युरेनियम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे युरेनियम अत्यंत धोकादायक असून जीवघेण्या किरणोत्सर्गाचा फैलाव करण्याची प्रचंड ताकद असल्याचंही विश्लेषणात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai ATS