मुंबई, 23 मे : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानसोबतचे चॅट उघड केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, याच चॅटवरुन सीबीआयने वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे शाहरुख खानसोबतच्या कथित व्यवहारातील मेसेजेसला ‘प्रामाणिकपणाचे सर्टिफिकेट’ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीबीआयने हायकार्टात सांगितले आहे. कॉर्डेलिया या जहाजातून ड्रग्ज जप्त प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर आरोप न लावण्यासाठी वानखेडे यांनी अभिनेत्याकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती एमएम साठ्ये यांच्या खंडपीठाने वानखेडे यांना या खटल्यातील सक्तीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण 8 जूनपर्यंत वाढवले आहे. गेल्या शुक्रवारी न्यायालयाने सीबीआयला 22 मे पर्यंत वानखेडेंवर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश दिले होते. शाहरुख खानसोबतच्या मेसेजच्या देवाणघेवाणीचा हवाला देत वानखेडे यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की अभिनेत्याचा त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. त्याने (खान) त्याला आपला मुलगा आर्यन खानशी नम्र राहण्याची विनंती केली होती. वाचा - 2 वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरून गेली आई, 15 तासाने गाडीत दिसलं भयाण दृश्य वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतची चॅट केली उघड वानखेडे यांनी दावा केला की अभिनेत्याने केवळ त्यांच्या सचोटीचे, प्रामाणिकपणाचे कौतुक केले नाही तर “या प्रकरणातील राजकीय सहभागाबद्दल आपला संतापही व्यक्त केला आहे”. संवादाचा संदर्भ देत, वानखेडे यांनी याचिकेत दावा केला आहे की जर त्यांनी (वानखेडे) आर्यन खानला सोडण्यासाठी पैशांची मागणी केली असती तर खानच्या मॅसेजसचा टोन पूर्णपणे विरुद्ध असता.
सीबीआयच्या वकिलांनी केला युक्तिवाद सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सीबीआयतर्फे उपस्थित असलेले वकील कुलदीप पाटील यांनी युक्तिवाद केला की या विनंत्या (शाहरुख खान आणि वानखेडे यांच्यातील संदेशांचा संदर्भ देत) एका वडिलांनी (खान) केल्या होत्या ज्याचा तरुण मुलगा (आर्यन) वानखेडेंच्या ताब्यात होता. सीबीआयचे वकील पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की वानखेडे हे (खान यांचे संदेश) “प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र” म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वानखेडे यांच्या अंतरिम जामिनाला विरोध वानखेडे यांना अंतरिम दिलासा सुरू ठेवण्यास विरोध करताना वकिल पाटील म्हणाले की, सीबीआयच्या अटकेच्या किंवा कोणत्याही कारवाईच्या मधे हा आदेश येऊ शकतो. तपास सुरू असताना अंतरिम संरक्षणाचा आदेश अनिश्चित काळासाठी असू शकत नाही, असेही ते म्हणाले. पाटील यांनी वानखेडे यांच्या याचिकेवर सीबीआयचे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला.