जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 2 वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरून गेली आई, 15 तासाने गााडीचा दरवाजा उघडताच दिसलं भयाण दृश्य

2 वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरून गेली आई, 15 तासाने गााडीचा दरवाजा उघडताच दिसलं भयाण दृश्य

2 वर्षाची मुलगी भयानक अवस्थेत आढळली

2 वर्षाची मुलगी भयानक अवस्थेत आढळली

या मुलांची आई त्यांना कारमध्ये बंद करून विसरून गेल्याचं आढळून आलं. नंतर जेव्हा तिला हे आठवलं तेव्हा गाडीतील चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 मे : कडक उन्हात कारमध्ये अडकून एका 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ती या कारमध्ये 15 तास राहिली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचे वडील क्रिस्टोफर मॅक्लीन आणि आई कॅथरीन अॅडम्स यांना अटक केली आहे. मुलीच्या शरीराचं तापमान 41.6 अंशांवर पोहोचलं होतं. कारमध्ये एक 4 वर्षांचा मुलगाही बंद होता, मात्र तो इथून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्याला सध्या बाल संरक्षण सेवांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. या प्रकरणाचा तपास केला असता या मुलांची आई त्यांना कारमध्ये बंद करून विसरून गेल्याचं आढळून आलं. नंतर जेव्हा तिला हे आठवलं तेव्हा गाडीतील चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिने आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत चिमुरडीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, दोन मुलं कारमध्ये झोपलेले असताना त्यांची आई त्यांना तिथेच विसरून गेली होती. यानंतर मुलं मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत कारमध्येच होती. ही घटना 16 मेची आहे. खळबळजनक! मेकअपसाठी गेली होती नवरी; पोलिसाने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून झाडली गोळी पोलीस अधिकारी म्हणाले, ‘दोन्ही मुलं कारमध्ये झोपली होती. यामुळे पालकांनी मुलांना गाडीतच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि घरी झोपायला गेले. दुपारी 3.41 वाजता त्यांची झोप उघडली आणि मुलं गाडीतच राहिले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. पोलिसांनी दाम्पत्याच्या घराची झडती घेतली असता तिथे ड्रग्ज सापडले. अधिकाऱ्याने मुलीच्या मृत्यूचं कारण ड्रग्ज असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की ड्रग्जच्या नशेमध्ये व्यक्ती वास्तविक जगात काय चाललं आहे ते विसरतो आणि मग अशा गोष्टी घडतात. पोलिसांनी अॅडम्स आणि मॅक्लीनला अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगणे आणि मुलांबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं, की मुलीच्या पोस्टमार्टमनंतर जोडप्याविरुद्ध आणखी आरोप लावले जाऊ शकतात..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात