भोपाळ, 9 जानेवारी: वरिष्ठांनी आदेश (Order from senior) देऊनही आपल्या अजब पद्धतीने (Strange) वाढवलेल्या मिशा (Moustache) आणि केस (Hair) कमी न केल्याबद्दल एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) आपली नोकरी गमवावी (Suspended from job) लागली आहे. मिशा, दाढी आणि केस अजब पद्धतीनं वाढवण्याची सध्या फॅशन आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे दाढी आणि मिशा वाढवत असतात. मात्र पोलीस दलातील शिस्तीसंबंधीच्या नियमात या बाबी बसत नाहीत. याची जणीव नसल्याचा मोठा भुर्दंड एका पोलिसाला नुकताच मोजावा लागल्याचं दिसून आलं. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये कॉन्स्टेबल राकेश राणा हे विशेष पोलीस महासंचालकांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. राकेश यांचे केस प्रमाणाबाहेर वाढले असून त्यांच्या मिशीची स्टाईल ही पोलीस दलातील निकष ओलांडणारी असल्याचं विशेष पोलीस महासंचालकांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर राकेश यांनी केस आणि दाढी काढून टाकावी, त्याचप्रमाणं योग्य प्रकारे मिशी ठेवावी, असे आदेश त्यांनी दिले. या आदेशाचं राकेश यांच्याकडून पालन होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र घडलं भलतंच. राकेश यांनी दिला नकार काही दिवसांनी राकेश यांची पुन्हा त्यांच्या वरिष्ठांसोबत भेट झाली. त्यावेळी राकेश यांनी केस आणि दाढी तशीच ठेवली असून आपल्या आदेशाचं पालन केलं नसल्याचं लक्षात आलं. याबाबत राकेश यांना विचारणा केली असता त्यांनी अजब उत्तर दिलं. काहीही झालं तरी आपण आपली मिशी कमी करणार नाही आणि आपल्या स्टाईलमध्ये कुठलाही बदल करणार नाही, असं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं. मात्र ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीत बसणारी नव्हती. हे वाचा -
राकेश यांचं निलंबन पोलीस दलात सर्वांनी केस बारीक राखणे आणि क्लिन शेव्ह करणं हा शिस्तीचा भाग आहे. राकेश यांना सवलत दिली, तर त्याचा इतर पोलिसांवर चुकीचा परिणाम होईल आणि सर्वांना चुकीचा संदेश जाईल, हे लक्षात घेऊन राकेश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना भविष्य निर्वाह निधी आणि इतर सरकारी सोयी मिळणार असून सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. मिशीच्या अमिषापायी त्यांना नोकरी गमवावी लागल्याची चर्चा मध्यप्रदेशात जोरदार रंगली आहे.