मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Sagar Dhankhar Murder: हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग,'या' ठिकाणी होणार सुशीलची चौकशी

Sagar Dhankhar Murder: हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग,'या' ठिकाणी होणार सुशीलची चौकशी

 ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाच्या (Sagar Dhankhar Murder case) तपासाला आता वेग आला आहे. शील कुमार फरार असताना त्याला आश्रय देणाऱ्या तसेच शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलीस करत आहेत.

ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाच्या (Sagar Dhankhar Murder case) तपासाला आता वेग आला आहे. शील कुमार फरार असताना त्याला आश्रय देणाऱ्या तसेच शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलीस करत आहेत.

ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाच्या (Sagar Dhankhar Murder case) तपासाला आता वेग आला आहे. शील कुमार फरार असताना त्याला आश्रय देणाऱ्या तसेच शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलीस करत आहेत.

नवी दिल्ली, 28 मे: ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाच्या (Sagar Dhankhar Murder case) तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) याच्यावरील गुन्हा सिद्ध करणारा एक मोठा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांच्या हाती एक व्हिडीओ फुटेज हाती लागलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्यासाठी सुशील कुमारला कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये चंदीगडला नेण्यात आले आहे.

सुशील कुमार फरार असताना त्याला आश्रय देणाऱ्या तसेच शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलीस करत आहेत. याच चौकशीचा भाग म्हणून सुशीलला चंदीगडला नेण्यात आले आहे. गँगस्टर काला जठेडीपासून सुशीलच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सुशील कुमारची सुरक्षा वाढवण्यात आली आली आहे. अंडरवर्ल्ड आणि कुस्तीपटू यांच्यात काही कनेक्शन आहे का? याचा तपास देखील दिल्ली पोलीस करत आहेत.

सुशीलच्या अडचणीत भर

सुशील कुमारच्या अडचणीत भर टाकणारा एक व्हिडीओ उघड झाला आहे. या व्हिडीओत सुशील कुमार सुशील कुमार हा सागर धनकढ, सोनू महाल आणि त्यांच्या साथीदारांना काठीने मारहाण करता दिसत आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित प्रिन्स जो सुशील कुमारचा जवळचा आहे त्याकडून मिळाला आहे. प्रिन्सवरदेखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

भारताचे प्रयत्न अपयशी, मेहुल चोक्सीला 'या' देशाकडे सोपवणार

सुशील कुमारने फेटाळले आरोप

सागर धनकर हत्या प्रकरणात दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला रविवारी अटक करण्यात आली. त्यानंतर  दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये सुशील कुमारने सर्व आरोप फेटाळले आहेत. 'मी निर्दोष आहे. माझी दिशाभूल करण्यात आली. मला लोकांनी लपण्याचा सल्ला दिला होता, ' असा दावा सुशील कुमारने केला आहे. त्याचबरोबर मी कुणाची हत्या का करु? असा प्रश्नही त्याने विचारला. त्याचबरोबर माझे कोणत्याही गँगस्टरळी संबंध नसल्याचा दावा सुशीलने केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशीलने हा दावा केल्यानंतर काही तासांनीच नवा व्हिडीओ उघड झाल्याने या प्रकरणात तो आणखी अडचणीत आला आहे.

First published:
top videos

    Tags: Chandigarh, Crime news, Delhi Police, Wrestler