बंगळुरू, 28 मे : एका तरुणाने आपली बीएमडब्ल्यू एक्स6 कार नदी फेकल्यामुळे पोलिसांसह स्थानिकही हैराण झाले आहे. सुरुवातीला त्यांना वाटलं की, चुकून गाडी नदीत पडली. तपासात समोर आलं की, बंगळुरूत (Bangalore news) राहणाऱ्या तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे तो खूप उदास झाला होता. यानंतर त्याने आपली बीएमडब्ल्यू एक्स6 कार नदीत फेकली. स्थानिकांनी नदीत अर्धवट अडकलेली बीएमडब्ल्यू एक्स6 कार दिसली. याची किंमत तब्बल 1.3 कोटी रुपये आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितलं. सुरुवातील पोलिसांना वाटलं की, गाडीत कोणीतरी असावं, मात्र काही वेळानंतर गाडीत कोणीच चालक नसल्याचं कळालं. आणि पोलिसांनी कार बाहेर काढली.
परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कारबाबत माहिती मिळवली. यात कळालं की, कारचा मालक बंगळुरूतील महालक्ष्मी लेआउटचा निवासी आहे. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. आईच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितलं. दुःखातून बाहेर पडू न शकल्याने तो आपल्या कारने श्रीरंगपटना येथे आला आणि बंगळुरूला परत येण्यापूर्वी निराशेत त्याने कार नदीत फेकली. श्रीरंगपट्टणाचे उपनिरीक्षक पुनीत यांनी सांगितलं की, नातेवाईकांच्या साक्षीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने कार परत बंगळुरूला नेली.. या घटनेसंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.