पाटना, 27 मे : बिहारमधील (Bihar News) रोहतासमध्ये शुक्रवारी एका कारमध्ये दोन भावांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जिल्ह्यातील कोचस येथील ओझवलिया गावातील आहे. एकाचं नाव मुकेश (10) आणि दुसऱ्याचं नाव आकाश (8) आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं शुक्रवारी सायंकाळी अन्य मुलांसह खेळत होते. यादरम्यान ते शेजारी उभ्या असलेल्या जुन्या कारचा गेट उघडून आता लपवले. यावेळी त्यांनी कारचं दार बंद केलं. यादरम्यान खेळताना कारचं दार उघडत होते, पण ते उघडलं नाही. श्वास गुदमरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
आतून लॉक झाली कार... स्थानिकांनी सांगितलं की, मंटू यादव याच्या घराजवळ एक कार उभी होती. यादरम्यान दोन्ही मुलं कारमध्ये बसून खेळू लागले. यादरम्यान कार आतून लॉक झाली. आत श्वास गुदमरल्यामुळे मुलं बेशुद्ध झाले. बराच वेळ मुलं दिसली नाही, म्हणून त्यांची शोधाशोध सुरू झाली. यादरम्यान कुटुंबीयांची नजर बंद कारच्या दिशेने गेली. तातडीने मुलांना कारमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांना जवळील एका रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.