लखनऊ, 14 मार्च : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) चित्रकूटमधून (Chitrakoot News) माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चित्रकूटमध्ये तंत्र-मंत्र आणि श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी एका दाम्पत्याने आपल्याच पुतण्याचा जीव घेतला. दिवाळीला आलेलं स्वप्न खरं मानून काका-काकीच्या जोडीने मुलाची गळा दाबून हत्या (Murder) केली. यानंतर मुलाचा मृतदेह धान्याच्या डब्यात बंद करून ठेवल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात काका-काकींना अटक केली आहे. हे प्रकरण राघवपुरी भागातील आहे. येथे राहणारा राम प्रयाग रैदान नावाच्या व्यक्तीने गेल्या महिन्यात 8 फेब्रुवारी रोजी आपला 9 वर्षीय मुलगा कन्हैया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 4 दिवसांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलाचा कुठेच पत्ता लागत नव्हता. मात्र 12 फेब्रुवारी रोजी बेपत्ता मुलाच्या शेजारील काका-काकींच्या घरातून दुर्गंधी पसरल्याने या घटनेचा खुलासा झाला. कन्हैयाचा मृतदेह धान्याच्या डब्याच ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवलं आणि तपास सुरू केला. याची कहाणी समोर आली तर पोलिसही हादरले. आरोपीने श्रीमंत होण्यासाठी मुलाची हत्या केली होती. हे ही वाचा- बुंदीचे लाडू विकण्याची मोठी शिक्षा, कोर्टाकडून 3 महिन्यांचा तुरुंगवास पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की, मृत अल्पवयीन मुलाची शेजारी राहणाऱ्या काका-काकींकडे येत-जात होता. भुल्लू आणि त्याची पत्नी उर्मिला यांनी दिवाळीला एक स्वप्न आलं होतं. यात त्यांच्या घरात तीन हंडा धन पुरल्याचं दिसलं. जर त्या ठिकाणी पूजा केली आणि कोणा अल्पवयीन मुलाचा बळी दिला तर त्यांना धन मिळेल. याच स्वप्नाला खरं मानून श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी दाम्पत्याने तंत्र-मंत्राची मदत घेतली. आरोपींनी आधी मुलाचा गळा दाबला आणि त्याच्या डोक्यावर दगडाने मारून हत्या केली. मृतदेह त्यांनी धान्याच्या डब्यात भरून ठेवला. कन्हैया बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढला. तोपर्यंत आरोपी तंत्र-मंत्राची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही आणि त्यांनी मृतदेह एका धान्याच्या डब्यात बंद करून ठेवला. पोलिसांची चौकशी सुरू असल्यामुळे मृतदेह घरात लपवावा लागला. त्यामुळे मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली. जेव्हा शेजारच्यांनी आरोपी दाम्पत्याच्या घरात तपास केला तर त्यांना मृतदेह दिसला. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक केली असून दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.